आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : भास्करच्या पत्रकाराची गोळया घालून हत्या, खाण माफियांनी दिली होती धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार धर्मेंद्र सिंह. - Divya Marathi
पत्रकार धर्मेंद्र सिंह.
पाटणा - बिहारच्या सासाराम जिल्ह्यात शनिवारी सकाळी दैनिक भास्करचे पत्रकार धर्मेंद्र सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. सकाळी घराजवळच्या चहाच्या टपरीवर ते चहा पित होते, त्याचवेळी एका बाईकवरून आलेल्या तिघांनी त्यांची हत्या केली. फायरिंगनंतर तिघे आरोपी घटनास्थळाहून फरार झाले आहेत.

हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू..
- धर्मेंद्र गोळी लागताच खाली कोसळले. त्यांच्या शरिरातून वेगाने रक्त वाहायला लागले.
- फायरिंगचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक जमा झाले होते. ते त्यांना सासारामच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
- त्याठिकाणाहून त्यांना डॉक्टरांनी वाराणसीला नेण्याचा सल्ला दिला. मात्र रस्त्यातच धर्मेंद्र यांचा मृत्यू झाला.

खाण माफियांच्या निशाण्यावर होते धर्मेंद्र
- धर्मेंद्र हे सासाराममध्ये अवैध खाण माफियांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या हत्येनंतर लोक रस्त्यावर उतरले आहेत.
- या प्रकरणातील आरोपींच्या अटकेची मागणी लोक करत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

13 मे रोजी झाली होती राजदेव रंजन यांची हत्या
- जर्नलिस्ट राजदेव रंजन यांची हत्या 13 मे 2016 रोजी सीवान रेल्वे स्थानकाजवळ झाली होती.
- या प्रकरणात शहाबुद्दीनलाही आरोपी बनवण्यात आले होते. पोलिसांनी 5 शूटर्सना अरेस्ट केले होते.
- पुलिसांना मिळालेल्या माहितीनुसार लड्डन मियां यांनी सांगितल्यामुळे राजदेवला गोळी मारली होती.
- लड्डन शहाबुद्दीनचा नीकटवर्तीय असल्याचे मानले जाते. त्याने सरेंडर केले होते.
पुढे पाहा, धर्मेंद्र यांचा जखमी अवस्थेतील PHOTO
बातम्या आणखी आहेत...