तिरुअनंतपुरम - कोझीकोडच्या सुन्नी मदरशामधील उस्ताद त्या ठिकाणी शिकत असलेल्या मुला-मुलींचे लैंगिक शोषण करतात, असा दावा 'जन्नत-ए-इस्लामी' या मळ्याळम दैनिकाच्या उप-संपादक व्ही. पी. रजिना यांनी 21व 22नाव्हेंबर रोजी
फेसबुकवर पोस्टमधून केला होता. त्या खाली तब्बल 2,014 फेसबुक युजर्संनी कॉमेंट केली. यापैकी बहुतांश जणांनी त्यांना घाणेरड्या शिव्या घातल्या. त्यामुळे त्या वादात अडकल्या आहेत.
फेसबुकने केले खाते बंद
सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रजिना यांचे फेसबुक अकाउंट नॉर्मल व्हेरिफिकेशनच्या कारण देत फेसबुकने बंद केले आहे.
काय म्हटले रजिना यांनी ?
मदरशातील उस्ताद तिथे शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप त्यांनी केला होता. या बाबत फेसबुकवरील पोस्टमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली होती. यात सांगितले होते की, मदरशातील उस्ताद कोणत्या प्रकारे इयत्ता पहिलीतील मुलांना एका लाइनमध्ये उभे करून त्यांच्यासोबत कसे अश्लील चाळे करतात. एवढेच नाही तर सर्वच निरागस मुलांवर हा अत्याचार होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दुसऱ्या पोस्टमध्ये रजिना यांनी इयत्ता चौथीमध्ये रात्रीच्या वर्गात मुलींचे केल्या जाणाऱ्या लैंगिक छळाची माहिती दिली.
व्ही. पी. रजिना यांना जीवे मारण्याची धमकी
व्ही. पी. रजिना यांनी केलेल्या या पोस्टमुळे त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत. पण, अशा धमक्यांना आपण घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असून, त्या आपल्या दाव्यावर ठाम आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्ही. पी. रजिना यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि संबंधित फोटोज...