आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा राम रहीम आणखी गोत्यात, 2 खून प्रकरणात आज सुनावणी; अडचणींमध्ये पडू शकते भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- डेरा सदस्य रणजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या खून प्रकरणात पंचकूला येथील सीबीआय कोर्टात शनिवारी सुनावणी सुरु होणार आहे. या दोन्ही प्रकरणात राम रहीम हा आरोपी आहे. हरियाणाच्या डीजीपींनी सांगितले की सुनारिया जेलमधून राम रहीम यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होईल. या काळात जेल आणि संपूर्ण पंचकूला परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीपला राजस्थानच्या लक्ष्मणगडमधून अटक करण्यात आली आहे. तो सालासार येथे लपला होता. 25 ऑगस्ट रोजी पंचकुला येथे सीबीआय कोर्टाने 2 साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावली.
 
पत्रकार रामचंद्र छत्रपती खून प्रकरण
- डेरा सच्चा सौदाविरोधात लिहिणाऱ्या पत्रकार रामचंद्र छत्रपतींचा खून करण्यात आला होता.
- डेरात 2 साध्वींवर बलात्कार करण्यात आल्याची बातमी सर्वप्रथम त्यांनी प्रसिध्द केली होती.
- राम रहीम यांच्याविरोधात बातमी दिल्याने त्यांचा 24 ऑक्टोबर 2002 रोजी 2 भाडोत्री गुंडांनी त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. एका आरोपीला जागेवरच पकडण्यात आले तर दुसऱ्याला नंतर पकडण्यात आले.
- 21 नोव्हेंबर 2002 रोजी छत्रपती यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात राम रहीम हे आरोपी आहेत. 
 
रणजीत सिंह खून प्रकरण
- हे प्रकरण साध्वींवर झालेल्या प्रकरणाशी संबंधित आहे. रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहित होते. त्याचा 10 जुलै 2003 मध्ये खून करण्यात आला. राम रहीम या प्रकरणातही आरोपी आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...