आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायाधीश नियुक्ती; जेपीसीला प्रत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी बनवलेल्या मसुद्याची प्रत, न्यायालयातील रिक्त जागांचा तपास करणाऱ्या संसदीय समितीला देण्यास सरकारने नकार दिला आहे. अद्याप मसुद्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशी सबब यासाठी सरकारने सांगितली. योग्य वेळी समितीला ही प्रत देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
स्टँडिंग कमिटी ऑन लॉ अँड पर्सनल संबंधित विभागाने न्यायिक विभागाला त्या ‘मेमोरेंडम ऑफ प्रोसेड्योर’च्या मसुद्याची प्रत मागितली होती. हा मसुदा सरकारने सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमकडे मंजुरीसाठी दिला होता. कॉलेजियमने सरकारच्या जुन्या प्रस्तावाला नाकारले होते.
बातम्या आणखी आहेत...