आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉपरने 10 लाखांत विकले न्यायाधीशपद परीक्षेचे पेपर; एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणातील न्यायाधीशांच्या १०९ पदांसाठी  १६ जुलै रोजी झालेल्या परीक्षेचा पहिला पेपर फुटला होता. या प्रश्नपत्रिकेची १०-१० लाखांत विक्री करण्यात आली. मेन्सची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याची हमी देण्यात आली होती. याची किंमत १ कोटी रुपये इतकी होती. हा सगळा व्यवहार सुनीता नावाची एक मुलगी करत होती. ती स्वत: परीक्षा देत होती. नंतर ती जनरल श्रेणीत टॉपर ठरली. तिने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे निबंधक (भरती) डॉ. बलविंदर शर्मा यांच्याशी एका वर्षात तब्बल ७६० वेळा फोनवर संपर्क साधला होता, असा गौप्यस्फोट पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या रिक्रुटमेंट कोर्ट क्रिएशन कमिटीने केला. समितीने सुनिता व सुशीला तसेच निबंधक डॉ. बलविंदर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली. हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी विशेष पोलिस तपास पथकाद्वारे करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
चुकून शेअर झाली रेकॉर्डिंग,  त्यामुळे गुपित उलगडले 
उच्च न्यायालयात चौकशीची मागणी करणाऱ्या पिंजौर येथील विधिज्ञ सुमन याही उमेदवार होत्या. त्या चंदिगडमधील एका अकादमीत सुशीला नावाच्या मुलीकडून शिकवणी घेत होत्या. एक दिवस सुशीलाकडील क्लास चुकला. तेव्हा त्यांनी सुशीलाला लेक्चरची ऑडिओ क्लिप व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास सांगितली. सुशीलाने चुकून दुसराच ऑडिओ पाठवला. त्यात पेपरच्या व्यवहाराची बोलणी होती. नंतर सुशीलाने सुमनच्या फोनमधील ही क्लिप वगळण्यास सांगितली. त्यानंतर सुमनने सुनीताशी संपर्क साधण्याची इच्छा सुशीलाकडे बोलून दाखवली. सुमनने सुशिलाच्या मदतीने सुनिताशी चंदिगडच्या सेक्टर - १७ येथे भेटीची वेळही ठरवली होती. सुनीता प्रथम मेन्सचा पेपर १ कोटी रुपयात विकणार असे सांगितले. मात्र, सुमनने इतके पैसे देण्यास असमर्थता दर्शवली.  या संवादावरून सुशीलावरही गुन्हा नोंदवावा, अशी शिफारस चौकशी समितीने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...