आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judge Heared 90 Year Old Women In Lobby Of Court

90 वर्षांच्या वृद्धेला पायऱ्या चढता येइना म्हणून न्यायाधिशांनी वऱ्हांड्यात भरवले कोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबादच्या जिल्हा कोर्टात वऱ्हांड्यात सुरू असलेले कोर्टाचे कामकाज. - Divya Marathi
होशंगाबादच्या जिल्हा कोर्टात वऱ्हांड्यात सुरू असलेले कोर्टाचे कामकाज.
भोपाळ - होशंगाबादमध्ये 90 वर्षांच्या एका महिलेसाठी कोर्टाच्या वऱ्हांड्यामध्ये कोर्ट भरवण्यात आले. त्याचे कारण म्हणजे या महिलेला वृद्ध असल्याने कोर्टाच्या पायऱ्या चढणे शक्य नव्हते. त्यामुळे होशंगाबादचे दंडाधिकारी मयंक शुक्ला यांनी अर्ध्या तासासाठी वऱ्हांड्यातच न्यायालय भरवले.

चोरीचे प्रकरण...
- होशंगाबादची राहणारी ही 90 वर्षीय महिला काशीबाईला चोरीच्या एका प्रकरणामध्ये जबाब नोंदवायचा होता.
- त्यांना सुमारे 20 वर्षांपासून चालता फिरता येत नव्हते.
- न्यायालयात उभे राहून जबाब नोंदवणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे न्यायाधीश मयंक शुक्ला यांनी माणुसकी दाखवत स्वतः बाहेर जाऊन वऱ्हांड्यात सुनावणी घेतली. त्याठिकाणीच महिलेचा जबाब नोंदवला.

परत यावे लागणार नाही ना...
- जबाब नोंदवल्यानंतर या वृद्ध महिलेने आपले दुःख न्यायाधिशांसमोर मांडले.
- त्यांनी थेट विचारले, साहेब आता परत तर कोर्टात यावे लागणार नाही ना? त्यावर न्यायाधीश मयंक शुक्ला त्यांना म्हणाले की, त्यांना आता यासाठी पुन्हा कोर्टात यायची गरज पडणार नाही.

पुढील स्लाइडसवर पाहा संबंधित PHOTOS