आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judge Of Madras High Court Does Case Hearing On Skype

तामिळनाडू : जजने Skype वर केली सुनावणी, घरून Email द्वारे निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
मदुराई - तामिळनाडूच्या मद्रास हायकोर्याने सोशल मिडिया आणि इंटरनेटचा वापर करत एका खटल्याची सुनावणी पूर्ण केली. शनिवारी न्यायाधीशांनी Skype द्वारे सुनावणी केली आणि घरूनच Email द्वारे निर्णय सुनावला. देशात अशा प्रकारच्या न्यायालयीन कारवाईची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. एम जेशू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर जस्टीस एस वैद्यनाथन यांनी सुनावणी केली.

ऑनलाईन सुनावणीमागचे कारण...
> दिवाळीच्या सुट्यांमुळे हायकोर्टात कोणतेही न्यायाधीश सुनावणीसाठी उपस्थित नव्हते.
> अशा स्थितीत हायकोर्टाचे प्रशासकीय न्यायाधीश व्ही रामासुब्रमण्यम यांनी मदुराई बेंचचे जस्टि‍स एस वैद्यानाथन यांना स्काइप (व्हिडिओ चॅट) द्वारे घरबसल्या संपूरर्ण सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
> खटल्याशी संबंधित सर्व दस्तऐवज स्कॅन करून इमेलद्वारे पाठवण्यात आले.
> जजने कोर्टाच्या आदेशाची कॉपीदेखिल शनिवारी रात्री 8 वाजता ईमेलद्वारे पोलिसांना पाठवली. सुरक्षेेबाबतची ही याचिका एम जेशू यांनी दाखल केली.

प्रकरण काय...
तामिळनाडूच्या रामनाथपुरमच्या एका चर्चमध्ये विवाहासाठी पोलिसांनी सुरक्षा देण्यासंदर्भात ही याचिका होती. जेशू यांच्या वकिलांनी सांगितले की, याचिकेद्वारे संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. पोलिस संरक्षणासाठीच तातडीने अर्ज दाखल करावा लागला. न्यायाधीशांनी पोलिसांना संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी विवाहसोहळा चर्चबाहेर व्हायला नको असेही आदेश देण्यात आले.