आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judgment Day Three Likely Scenarios And What They Mean For Amma

जयललितांची निर्दोष मुक्तता, CM पदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना दोषमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
कर्नाटक हायकोर्टात जयललितांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात जयललितांच्या तीन सहका-यांचाही सहभाग आहे. त्यात जयललितांची मैत्रिण शशिकला याही होत्या.
पुढे काय ?
- कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करू शकते.
- जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनू शकतात.
- निवडणूक लढवण्यासाठी असलेली बंदीही आता नसेत. त्यामुळे पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवू शकतात.
- एकट्या जयललिता यांच्या जिवावर चालणा-या त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न सुटला आहे.

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जवळपास पक्की
‘अम्मा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जयललिता यांच्यादृष्टीने या निर्णयाचे महत्त्व म्हणजे, तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांना पुन्हा एकदा विराजमान होणे जवळपास नक्की आहे. कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टात निर्णयाविरोधात अपिल केले तरी त्याचा निर्णय यायला बराच वेळ लागणार आहे. पण जर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर मात्र जयललितांना मुख्यमंत्री बनता येणार नाही.

काय होते प्रकरण?
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अॅक्ट म्हणजे पीसीए अंतर्गत सत्र न्यायालयाने जयललिता, शशिकला, जे. एलव अरासी आणि व्ही. सुधाकरन यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. त्याचमुळे जयललितांवर सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी लादण्यात आली होती. तसेच यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरूनही पायउतार व्हावे लागले होते.

'अम्मा' दिसणार ?
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयानंतर जयललिता सुमारे सात महिने सार्वजनिक रित्या दिसल्या नव्हत्या. निर्णयानंतर लगेचच त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती. पण जमानत मिळाल्यानंतरही त्या सर्वांसमोर दिसून आल्या नव्हत्या. त्यामुळे आता या निर्णयानंतर त्या समोर येतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, निर्णयानंतर जयललिता यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाचे फोटो...