आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judgment In Salman Khans Illegal Arms Case Blackbuck Poaching Cas

काळवीट शिकार प्रकरण: सलमानला गैरहजर राहाण्याची परवानगी मान्य, 3 मार्चला सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान) - काळवीट शिकार प्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याचा अभिनेता सलमान खानवर आरोप आहे. या प्रकरणात जोधपूर जिल्हा न्यायालय आज (बुधवार) निर्णय देण्याची शक्यता होती, मात्र सलमान खानच्या वकीलांनी त्याला गैरहजर राहाण्याची परवानगी मिळावी आणि या प्रकरणातील इतर अर्जांची सुनावणी आधी घ्यावी अशी विनंती केली. ती कोर्टाने मान्य केली आहे. पुढील सुनावणी तीन मार्च रोजी होणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणातील अवैध शस्त्र प्रकरणी आज येथील चीफ ज्यूडीशिअल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात सुनावणी झाली. यावेळी त्याच्या वकीलांनी सलमानला गैरहजर राहाण्याची परवानगी मिळावी असा अर्ज केला. तो कोर्टाने मान्य केला आहे. त्यासोबतच आज दिला जाणारा निर्णय इतर अर्जांवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवावा अशी विनंती केली.

1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सलमान खानसह आणखी काही बॉलिवूड कलाकारांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप होता. 15 ऑक्टोबर 1998 ला सलमान खानविरोधात जोधपूरच्या वन विभागाने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोन काळवीटांच्या शिकार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी संपली आहे.
सलमानवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा का ?
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान 1 -2 ऑक्टोबर 1998 ला सलमान खानने काळवीटांची शिकार केली होती. शिकारीसाठी त्याने ज्या बंदूकीचा वापर केला होता, तिचा परवाना रद्द झालेला असल्याचे समोर आले होते. यामुळे सलमानवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर केवळ अवैध शस्त्र बाळगल्याचा आणि त्याचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यासोबतच परवाना संपलेले शस्त्र बाळगल्याचाही आरोप आहे.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावली पाच वर्षांची शिक्षा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवुन कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला हायकोर्टाने स्थिगीती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रिम कोर्टात गेले. सुप्रिम कोर्टाने यात दखल देण्यास नकार देत कनिष्ठ न्यायालयात पुन्हा सुनावणीसाठी पाठवले.