आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judicial Custody Of Asaram Bapu Exptended Till 25th October

आसाराम बापूचा दसरा तुरुंगातच; जाणून घ्‍या नारायणचा कसा झाला साई...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अल्‍पवयीन मुलीच्‍या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेल्‍या आसाराम बापूला आज (शुक्रवार) जोधपूर न्‍यायालयात हजर करण्‍यात येणार आहे. गुजरात पोलिसांनी आसाराम बापूचा ताबा मागितला आहे. यासंदर्भात गुजरात पोलिसांच्‍या प्रॉडक्शन वॉरंटवर सुनावणी होणार आहे. दरम्‍यान, आसाराम बापूची न्‍यायालयीन कोठडी 25 ऑक्‍टोबरपर्यंत वाढविण्‍यात आली आहे. आसाराम बापू आणि त्‍याचा मुलगा नारायण साईवर दोन बहिणींनी बलात्‍काराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी सूरत येथे तक्रार दाखल करण्‍यात आली होती. त्‍यामुळे गुजरात पोलिसांना चौकशीसाठी आसाराम बापूला अहमदाबाद आणि सूरत येथे न्‍यायचे आहे. दुसरीकडे, नारायण साई समन्‍स बजावल्‍यानंतरही चौकशीसाठी हजर झाला नाही. त्‍यामुळे त्‍याला अटक करण्‍यात येऊ शकते. चौकशीसाठी पोलिसांसमोर न येता तो जाहिराती आणि इंटरनेटवरुन खुलासे प्रसिद्ध करत आहे.

सूरतच्‍या दोन बहिणींनी नारायण साईला बलात्‍कार आणि लैंगिक शोषणाची सवय असल्‍याचे म्‍हटले आहे. तो स्‍वतःला इश्‍वर किंवा इश्‍वराचा अवतार म्‍हणून स्‍वतःची प्रतिमा तयार करतो आणि मुलींवर बलात्‍कार करतो, असे या बहिणी सांगतात. आसाराम बापूच्‍या कुटुंबियांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहे. आमच्‍याविरुद्ध फार मोठे षडयंत्र रचण्‍यात आल्‍याचे बापूच्‍या कुटुंबियांचे म्‍हणणे आहे.

नारायणचा कसा झाला साई... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...