आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judicial Magistrate Arrested In Case Of Rape Allegations

महिला पोलिसासोबत न्‍यायमूर्तीं \'लिव्‍ह इन\'मध्‍ये, बलात्‍काराचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- तामिळनाडूमध्‍ये न्‍यायदात्‍याकडूनच कायद्याच्‍या रक्षकावर अत्‍याचार केल्‍याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला पोलिस उपनिरिक्षकावर बलात्‍कार केल्‍याचा आरोपात 31 वर्षांच्‍या न्‍यायमुर्तींना (ज्‍युडिशियल मॅजिस्‍ट्रेट) अटक केली आहे.

पोलिसांनी न्‍या. एस. त्‍यागराज यांना अटक केली. एका महिला पोलिस उपनिरिक्षकासोबत ते 2 वर्षांपासून लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये राहत होते. त्‍यानंतर त्‍यांनी हे संबंध तोडले. संबंधित महिला अधिका-याने त्‍यागराज यांच्‍यावर बलात्‍कार आणि हुंड्याची मागणी केल्‍याचे आरोप करीत तक्रार दाखल केली. त्‍यागराज हे एका द्रुतगती न्‍यायालयात सुनावणी करीत असतानाच त्‍यांना पोलिसांनी अटक केली.

तक्रारकर्ती महिला अधिकारी म्‍हणाली, त्‍यागराज यांची न्‍यायमूर्ती म्‍हणून नियुक्ती होईपर्यंत आम्‍ही सोबत राहत होतो. ते त्‍यावेळी वकील म्‍हणून जबाबदारीवर होते. मी पल्‍लाडाम पोलिस ठाण्‍यात तैनात होती. परंतु, न्‍यायमूर्ती झाल्‍यानंतर त्‍यांनी मला टाळण्‍यास सुरुवात केली. याचवर्षी 20 जूनला त्‍यांनी दुस-याच महिलेसोबत विवाह केला.

त्‍यागराज यांच्‍याविरुद्ध धोका देऊन बलात्‍कार केल्‍याचा आणि धमकाविण्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. आपल्‍याकडे पुरावा म्‍हणून त्‍यागराज यांचे 8 हजार एसएमएस आणि 14 लाख सेकंदांपर्यंतच्‍या संभाषणाची माहिती असल्‍याचा दावाही महिला अधिका-याने केला आहे.

न्‍यायमूर्तींच्‍या अटकेनंतर तामिळनाडूमध्‍ये कायदेतज्‍ज्ञांमध्‍ये नाराजी आहे. वकीलांनी अटकेच्‍या विरोधात निदर्शने केली. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार न्‍यायमूर्तींना अटक करण्‍यापूर्वी उच्‍च न्‍यायालयाकडून परवानगी घेण्‍यात आली होती.