आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jurisdiction Accused Will Pronounce The Verdict Bailiff Of The Conductor At Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रद्युम्‍न मर्डर केस: ज्युरिस्डिक्‍शन आणि आरोपी कंडक्‍टरच्‍या जामिनावर आज फैसला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव कोर्टात सुनावणीसाठी आलेली सीबीआयची टीम. - Divya Marathi
गुडगाव कोर्टात सुनावणीसाठी आलेली सीबीआयची टीम.

गुडगाव- रेयॉन इंटरनॅशनल स्‍कुलमधील प्रद्युम्‍न मर्डर प्रकरणाची सोमवारी अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधिश रजनी यादव यांच्‍या कोर्टात सुनावणी झाली. यावेळी दोन्‍ही बाजुच्‍या वकीलांनी आरोपी बस कंडक्‍टर अशोक याच्‍या जामिन याचिकेवर आपआपली बाजू मांडली. आज मंगळवारी याबाबतचा निकाल कोर्ट सुनावणार आहे.

 

40 मिनिटे झाली सुनावणी
- सामेवारी दुपारी 12 वाजता जिल्‍हा न्‍यायालयात या प्रकरणाच्‍या सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी सीबीआयचे 5 अधिकारी आणि त्‍यांचे वकील, वरुण ठाकुर (प्रद्युम्‍नचे वडील), त्‍यांचे वकील आणि आरोपी अशोकचे वकील मोहित वर्मा कोर्टात उपस्थित होते. यावेळी ज्‍युरिस्डिक्शनवरही कोर्टात सीबीआयच्‍या वकीलांनी आपली बाजु मांडली.
- त्‍यांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणाचे ज्‍युडिशियल क्षेत्र पंचकुला येथे आहे. तेथे सीबीआयचे स्‍पेशल कोर्ट आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची सुनावणीही तेथेच केली जावी. जवळपास 40‍ मिनिटे कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली.


सीबीआयचा अशोकच्‍या जामिनाला विरोध
- कोर्टात सीबीआयच्‍या वकीलांनी सांगितले की, अजुनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. कंडक्‍टर अशोकला अद्यापही क्लिन चीट देण्‍यात आलेली नाही. जोपर्यंत सीबीआय चार्जशीट दाखल करत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लिन चीट देता येणार नाही.
- वकीलांनी सांगितले की, या प्रकरणी सीबीआयने जरी एका विद्यार्थ्‍याल अटक केली आहे. तरीदेखील केसच्‍या या टप्‍प्‍यावर आरोपी अशोकला जामिन मिळू नये.

 

मंगळवारचा दिवस महत्वपूर्ण
- आज मंगळवारी  कोर्ट अशोकच्‍या जामिनावर आणि ज्‍युरिस्डिक्‍शनवर निर्णय देणार आहे. 22 नोव्‍हेंबररोजी 11वीच्‍या विद्यार्थ्‍याला जेजे बोर्डमध्‍ये सीबीआय सादर करणार आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...