आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 13 दिवसांनी नवरीचा मृत्यू, सहकाऱ्यांना सांगता होती- येथून निघून जाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- फाजिल्का-फिरोजपूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नववधूचाही समावेश आहे. केवळ 13 दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिच्या हातावरची मेंदीही अजून निघाली नव्हती. पण तिच्यावर काळाने आघात केला. लग्न झाल्यानंतर ती सांगत होती, की मी येथून निघून जाईल. या अपघातात 12 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
येथून मी निघून जाईल असे सांगत होती नवरी
- 25 वर्षीय नववधूचे नाव तेजिंदर कौर आहे. भाई मानसिंग खालसा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होती.
- तेजिंदरचे लग्न 27 नोव्हेंबरला झाले होते. तिच्या सहकारी शिक्षकांनी सांगितले, की ती काही दिवसांपासून म्हणत होती, की मी हे सगळे सोडून जाणार आहे. तिला कदाचित या घटनेचा आधीच आभास झाला असावा.
- माझे मन सांगते, की मी येथून निघून जावे. काही तरी होणार आहे, घडणार आहे, याचा अंदाज तिला आला असावा.
- शाळेतील शिक्षक एकाच कारमधून जात होते. यावेळी समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
- अपघात एवढा भीषण होता, की 12 शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेहही कार कापून काढावे लागले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...