आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीश, सहा न्यायमूर्तींनी माझ्या निवासस्थानी यावे; न्यायमूर्ती कर्णन यांचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर सहा न्यायमूर्तींना २८ एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानातील न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या न्यायमूर्तींच्या पीठाने न्यायमूर्ती कर्नन यांना अवमानना नोटीस जारी केली होती आणि त्यांचे न्यायालयीन आणि प्रशासकीय अधिकार हिरावून घेतले होते.

संविधान पीठाच्या सात न्यायमूर्तींनी आपल्याला क्रूरतापूर्वक, जाणूनबुजून आणि दुर्भावनेतून आपला अपमानित केले आहे, असा दावा न्यायमूर्ती कर्णन यांनी केला आहे. त्यांनी या न्यायमूर्तीवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप करत बचाव करण्यासाठी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. 

न्यायमूर्ती कर्णन यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले की, २८ एप्रिलला हे सात न्यायमूर्ती माझ्यासमोर हजर होतील आणि आपली बाजू मांडतील. त्यांनी आपल्या निवासस्थानातून हा आदेश जारी करताना म्हटले की, हे निवासस्थान आता अस्थायी न्यायालय झाले आहे. त्यांनी गुरुवारी आदेशात म्हटले की, ३१ मार्चला सरन्यायाधीशांनी माझ्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला न्यायपीठाच्या इतर न्यायमूर्तींनीही सहमती दर्शवली होती. हे खल्या न्यायालयात अपमानित करण्यासारखे होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...