आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लतांंमुळे बनल्या ‘जस्टिन बीबीज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - आम्हाला स्वप्नातही कधी वाटले नाही की एवढी प्रसिद्धी मिळेल. जीवन असे बदलून जाईल. टीव्ही वाहिन्यांनी आम्हाला लाइव्ह गाण्यांसाठी निमंत्रण दिले होते. गाण्याच्या अगोदर आम्हाला मेकअप करून सजवण्यात आले. विमान प्रवासाची संधी दिली. हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. कारण एकदा फीस भरली नाही म्हणून आम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

पाकिस्तानातील लाहौरच्या सानिया आणि मुकद्दस आपली हकिकत काहीशा अशाच पद्धतीने सांगतात. लोक त्यांना आता ‘जस्टिन बीबीज’ नावाने संबोधतात. त्यांना इंग्रजी काय उर्दूदेखील नीटपणे येत नाही; परंतु पॉप सिंगर जस्टिन बीबरची गाणी त्या कसलेल्या कलावंताप्रमाणे गातात. त्याला तोड नाही. सुरुवात कशी झाली? चार वर्षांपूर्वी आम्ही लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी ऐकण्यास सुरुवात केली होती. आम्ही त्यांच्याच सुरात गाण्याचा प्रयत्न करत असूत. आम्हाला गाताना पाहून शेजारच्या घरातील लोक छतावर जमत असत. त्याचदरम्यान आम्ही कॅनडाचे गायक जस्टिन बीबरला ऐकले. त्यांचा आवाज आमच्या मनात उतरला. आम्हाला इंग्रजी बिलकूल येत नव्हती. त्यामुळे गाण्यांना अगदी बारकाईने ऐकले. प्रत्येक शब्दाला उर्दूत लिहिले. त्याला तासनतास गाऊन बघितले. त्यानंतर आम्ही अगदी त्यांच्याप्रमाणे गाऊ लागलो. आम्हाला ज्यांनी ऐकले, ते सर्व थक्क झाले. अशातच बीबरचे गाया बेबी गीत गाताना आमचा व्हिडिआे सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे आम्ही जगभरात पोहोचलो. आता जस्टिन बीबरची भेट घेण्याचीदेखील आमची इच्छा आहे.
बातम्या आणखी आहेत...