आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालादेवी मंदिरात 200 रुपये रोजाने काम करून खर्च भागवला, दहावीत 71% गुणही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ‘बाबांचा अपघात झाल्याने त्यांचे चालणे-फिरणे थांबले. ते अंथरुणाला खिळले. उपचारांत जमापुंजी खर्च झाली. घरखर्चही भागवणे अवघड झाले होते. बाबांशिवाय घरात दुसरे कमावणारे कुणी नव्हते. मी काम करण्याचा निश्चय केला. ज्वालादेवी मंदिरात आमचे कुटुंब पाच पिढ्यांपासून नगारे वाजवण्याचे काम करत आहे. यामुळे तो वारसा पुढे चालवण्याचा निर्णय मी घेतला.’
हिमाचल प्रदेशातील शक्तिपीठ ज्वालादेवी मंदिराजवळ राहणारी १८ वर्षांची नेहा सांगते, मुलगी असल्याने काम सुरू करण्याआधीच नातेवाईक समाजातून विरोध सुरू झाला. सर्वांपेक्षा मला माझे बाबा महत्त्वाचे होते. यामुळे मी काम सुरू केले. आजही तेथे २०० रुपये रोज मिळतात. रक्कम लहान असली तरी घर चालवता येते. मंदिराच्या नियमानुसार तीन दिवसांनी नगारे वाजवण्याचे काम मिळायचे. दोन वर्षे मी हे काम केले. आता बाबा बरे होत आहेत. नगारे वाजवताना लोकांच्या नजरांमुळे मला भीती वाटायची, तेव्हा मी बाबांचे स्मरण करायचे. आई सुनीतादेवी म्हणाल्या, नेहाने या पैशांनी घरखर्च भागवला, भावाच्या शाळेची फीसही भरली. नेहाचा संघर्ष कळल्यावर शाळेने शुल्क माफ केले. दरम्यान, नेहाने स्वत:चे शिक्षणही सुरू ठेवले. २०१४ मध्ये दहावीत ७१.४% गुण मिळवले. आता ती बारावीत आहे. पाच शस्त्रक्रियांनंतर तिचे बाबा बरे होत आहेत. त्यांनीही नगारे वाजवण्याचे काम सुरू केले आहे. नेहा सुटीच्या दिवशी त्यांच्या मदतीसाठी जाते.

मुलगी नसती तर माझा पाय कापावा लागला असता
पिता विधीचंद म्हणाले, अपघातानंतर रुग्णालयात गेलो. डॉक्टरने बेपर्वाईने ऑपरेशन केले. पायात संसर्ग पसरला. चंदिगडच्या डॉक्टरने सांगितले, वेळेवर दुसरे अॉपरेशन केले नाही तर पाय कापावा लागेल. मुलीने कठोर मेहनत केली, त्यामुळेच आता चालू शकताेय. विरोधानंतरही जखमी पित्याच्या जागी मुलीने सांभाळले मंदिरात नगारे वाजवण्याचे काम, घरगाडाही चालवला!
बातम्या आणखी आहेत...