आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालादेवी मंदिरात मूर्ती नव्हे, ज्योतीची होते पूजा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांगडाहून (हिमाचल प्रदेश) - हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यात कालधार डोंगरांच्या मधोमध ज्वालादेवी मंदिर आहे. माता ज्वालादेवी तीर्थक्षेत्र म्हणजे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक. येथे देवी सतीची जिव्हा पडली होती. हे जगातील असे पहिले मंदिर आहे जिथे मूर्तीची पूजा केली जात नाही. विशेष म्हणजे येथे शतकानुशतके तेल-वातीविना नैसर्गिकरीत्या ११ ज्योती तेवत आहेत. यातील चांदी जालादरम्यान असलेली प्रमुख ज्योत म्हणजेच महाकाली. इतर १० ज्योतींमध्ये अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजीदेवी म्हणून पुजल्या जातात. साधारणपणे मंदिरांत दोन वेळा आरती होते. इथे मात्र रोज पाच वेळा आरती होते.
एरव्ही या तीर्थक्षेत्री रोज ५ ते ६ हजार भाविक येतात. नवरात्रात मात्र ही संख्या दीड ते दोन लाखावर जाते. अंदाजे ५ ते ६ कोटी दान स्वरूपात जमा होतात. नवरात्रात पहिल्या दिवशी रात्रीच भक्त दाखल होण्यास सुरुवात झाली. या मंदिरावर परदेशी नागरिकांचीही श्रद्धा आहे. येथे येणाऱ्या भाविकांत ५ टक्के भाविक परदेशी असतात. सध्या मंदिर फुले आणि वीजदिव्यांनी सजले असून येथे ब्रह्ममुहूर्तावरील आरतीचे अतिशय महत्त्व आहे. तासन‌्तास रांगेत उभे राहून भाविक ज्या ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचतात तिथे तीन वेळा आरती होते. लाकडी सरपणाचा वापर करून ३ नैवेद्य तयार होतात. मंदिराचे अधिकारी डॉ. अशाेक पठाणिया व पुजारी धर्मेंद्र शर्मांनुसार, मंदिराचे वार्षिक उत्पन्न १३ कोटी आहे. दान स्वरूपात आलेल्या रकमेपैकी ३० टक्के भाग पुजाऱ्यांना दिला जातो. भक्तांना बसस्थानकावरून लिफ्टने थेट मंदिरात पोहोचता यावे म्हणून येथे ४० कोटी खर्चाचा प्रकल्प सुरू आहे. पुढील वर्षी तो पूर्ण होईल.
बातम्या आणखी आहेत...