आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी 5 रुपयांसाठी केली मजुरी, उपाशी काढले दिवस, आज आहे 32 कोटींच्या कंपनीची CEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरः यूएस बेस्ड सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओ डॉ. ज्योती रेड्डी यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग फिक्की फ्लो कार्यक्रमात शेअर केले आहेत. जयपूर येथील हॉटेल आयटीसी राजपुताना येथे झालेल्या कार्यक्रमात काजल या लघुपटाचे स्क्रिनिंगसुद्धा झाले. फ्लो जयपूर चॅप्टरच्या अध्यक्षा मीन जैन यांनी कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली होती. 

ज्योती यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत...  
- आम्ही पाच बहीणभावंड होतो. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आमचे बालपण गेले. आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती, की एकाच चादरवर आम्ही बहीणभाऊ आणि आईवडील झोपायचो.  
- अनेक दिवस उपाशी राहावे लागायचे. आई आम्हाला बघून रात्रभर रडायची. बेताच्या परिस्थितीमुळे आमच्या वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला गावाजवळच्या एका अनाथआश्रमात सोडले होते.
- ही आपल्या भारतीयांची मानसिकता आहे, की लोक मुलांना जवळ ठेवतात आणि मुलींना घराबाहेर काढतात. त्या अनाथ आश्रमात 60 मुले होती.  
- त्या अनाथ आश्रमात माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. तेथील मुले 14 नोव्हेंबरची आतुरतेने वाट बघत असत. कारण एक मिमिक्री आर्टिस्ट त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथे ब्लँकेट आणि चॉकलेट वाटत असे. 
- एवढ्या संघर्षातसुद्धा मी माझे शिक्षण सुरु ठेवले होते. कलाम साहेबांचे म्हणणे मी लक्षात ठेवले होते. ते म्हणाले होते, लास्ट बेंचरसुद्धा ब्रिलियंट असतो आणि मी लास्ट बेंचर होते.

आयुष्य धडे देत होते...
- या दुःखातूनच मी यश मिळवू शकले. वयाच्या 16 व्या माझे लग्न झाले आणि वयाच्या 18 व्या वर्षीपर्यंत दोन मुली माझ्या पदरात पडल्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे नसायचे.
- मुलींच्या संगोपनासाठी मी नेहरु युवा केंद्रात व्हॉलेंटिअर म्हणून काम सुरु केले. आयुष्यातील चढउतारातूनच बरंच काही शिकायला मिळालं.

32 कोटींच्या कंपनीची आहे सीईओ...
- एक काळ असा होता, जेव्हा ज्योती पाच रुपयांसाठी दिवसभर मजुरीचे काम करायच्या. त्यानंतर त्यांनी 398 रुपये पगारावर शाळेत नोकरी केली. आज त्या ज्या कंपनीच्या सीईओ आहेत, त्याचे टर्नओव्हर 5 मिलियन डॉलर म्हणजेच 32 कोटी इतके आहे. सोबतच त्यांनी ह्ययूमॅनिटीत डॉक्टरेट प्राप्त केले आहे.

पुढील स्लाईड्सवर छायाचित्रांमधून बघा, ज्योती यांचा प्रवास...
बातम्या आणखी आहेत...