कानपूर- हायप्रोफाइल ज्योती हत्याकांडात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय एका हल्लेखोराची पॅंटही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यावर मृत ज्योतीच्या रक्ताचे दाग आहेत. पोलिसांनी रिमांडदरम्यान मुख्य आरोपी पीयूषसह अन्य आरोपींची कसून चौकशी केली. हल्लेखोरांची नार्को तसेच पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचे एसएसपी के. एस. इमैनुअल यांनी सांगितले.
दुसरीकडे, तुरुंगात मुख्य आरोपी पीयूष आणि त्याची प्रेयसी मनीषाला व्हीअायपी सर्व्हिस मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी रोशन जॅकब आणि एएएसपी के.एस. इमैलुअम यांनी तुरुंगात छापेमारी केल्याची माहिती समजली आहे.
कानपूरमधील बिस्किट व्यवसायिकाचा मुलगा पीयूष यानेच पत्नी ज्योती हिच्या हत्येचा कट रचला होता. त्याच्या सांगण्यावरूनच आरोपी अवधेश आणि त्याच्या तीन साथीदारांनी ज्योतीची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी स्वरूपनगर ठाणे पोलिसाठी मंगळवारी सर्व आरोपींना 24 तासांच्या रिमांडसाठी घेण्यात आले होते.
आयजी आशुतोष पांडे यांनी सांगितले की, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार हत्याकांडात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. पनकी रोडवरील एका झुडपात हा चाकू सापडला. याशिवाय एका आरोपीची पॅंटही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यावर मृत ज्योतीच्या रक्ताचे दाग आहेत. चाकू आणि रक्ताचे दाग असलेली पॅंट कोर्टात मुख्य पुरावा म्हणून सादर केले जाणार आहे.
नमुने डीएनएसाठी पाठवले...
ज्योतीच्या मृतदेहाचे काही नमुने डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेला चाकू आणि पँटवरील रक्ताचे नमुनेही तपासले जाणार आहेत. कोर्टात दोन्ही वस्तू पुरावा म्हणूनही सादर केला जाणार आहे. पोलिसांनी ज्योतीचे सोन्याचे टॉप्स, साखळी आणि अंगठी आधी हल्लेखोरांकडून जप्त केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पीयूष आणि मनीषाला तुरूंगात मिळतेय व्हीआयपी सर्व्हिस...
(फोटो: ज्योती हत्याकांडात वापरण्यात आलेल्या चाकू दाखवताना पोलिस)