लखनऊ - कानपूरच्या हायप्रोफाइल ज्योती हत्याकांडात रोज नवनवीन आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित अहवालानुसार या खुनाचा मास्टरमाइंड आणि ज्योतीचा पती पीयूष पीयूषला मृत्यूच्या वेळी ज्योतीचा आक्रोश ऐकायचा होता. त्यामुळे त्याने हत्या-याला म्हणजेच अवधेशला खून करताना फोन सुरू ठेवायला सांगितले होते. अवधेशनेही तसेच केले.
पोलिसांकडून कौतुक
हाईप्रोफाइल ज्योती हत्याकांडांतील मुख्य आरोपी असणा-या पीयूषचा पोलिसांकडून चांगलाच लाड होत आहे. पोलिस चौकशीदरम्यान सीओ राकेश नायक यांनी पीयूषचे कौडकौतुक केले तसेच त्याला म्हणाले, काही होत नाही बेटा, अशा चुका होतच असतात. याबाबत विचारणा केली असता, आरोपीकडून सत्य जाणून घेण्यासाठी असे केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
कानपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक आशुतोष पांडे यांनी या प्रकरणी लगेचच कडक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. हा प्रकार करणारे राकेश नायक यांना सीओ पदावरून हटवण्यात आले असून, कानपूर अधीक्षक कार्यालयात त्यांची बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या विरोधात सर्व्हीस रूलअंतर्गत तपास केला जात असून ज्योती हत्याकांड प्रकरणातून दूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीयूष म्हणाला पोलिसांनी फसवले
दरम्यान पीयूषने पत्रकारांना आपल्याला फसवलण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच ड्रायव्हर अवधेशने आपल्याबरोबरची खुन्नस काढण्यासाठी पत्नीचा खून केल्याचेही तो म्हणाला. पत्रकारांनी कोणत्या कारणामुळे खुन्नस होती, असे विचारल्यावर मात्र त्याने काहीही उत्तर दिले नाही.
फोटो : पीयूषचे कौतुक करणारे सीओ राकेश नायक
पुढे वाचा, ड्रायव्हर प्रेमिकाही अटकेत...