आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyoti Murder Case Husband Accepted Crime Kanpur Latest News

ज्योती हत्याकांड : प्रेमिका, ड्रायव्हरच्या मदतीने पत्नीला मारले, पतीने मान्य केला गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : मृत ज्योती

कानपूर - बिस्‍किट कंपनीच्या मालकाच्या सुनेच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीयूषनेच त्याची पत्नी ज्योतीचा खून केला होता. पीयूषचे दुस-या एका महिलेबरोबर जवळीक वाढली होती. ज्योती वारंवार त्याचा विरोध करत होती. त्यामुळे ज्योतीची हत्या केल्याचे त्याने मान्य केले आहे. या कामात पीयूषने त्याचा ड्रायव्हर आणि प्रेमिकेची मदत घेतली होती.
रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ज्योतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना सुरुवातीपासूनच तिचा पती पीयूषवर होता. मंगळवारी पोलिसांनी पीयूषची चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले होते. पीयूष या प्रकरणातील सर्वात मोठा संशयीत असल्याचे पोलिस महासंचालक आशुतोष पांडेय यांनी आधीच स्पष्ट केले होते. घटनास्थळी मिळालेले सर्व पुरावे त्याच्या विरोधात होते. तसेच तो पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांनी म्हटले होते. त्याचे कारण म्हणजे पीयूष एकापाठोपाठ एक सर्व जबाब बदलत होता.
ज्योतीच्या शरीरावर जवळपास 15-20 वार करण्यात आले होते. तसेच तिचे बोट कापण्यात आले होत आणि हि-याची अंगठीही गायब होती. दुसरे सर्व सामान आणि दागिने मात्र जागच्या जागीच होते. या सर्व बाबींमुळे हा खून सराइत गुन्हेगाराने केला नसल्याचा संशय पोलिसांना आला होता.
पतिवर संशय येण्याची कारणे
- घटनेनंतर पतीने लगेचच 100 क्रमांकावर माहिती दिली नाही. सुमारे तासभर उशीराने तो आपल्या कुटुंबीयांसह तक्रार दाखल करण्यासाठी गेला.

- कानपूरच्या एका महिलेबरोबर त्याचे संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक या महिलेचीही चौकशी करत आहेत. त्यातच पीयूषकडे दोन मोबाइल असल्याचे पोलिसांना समजले. घटनेपूर्वी त्याने 27 जुलैला सायंकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत एका महिलेला 150 मॅसेज केल्याचेही पोलिसांना समजले.

- ज्या कारमध्ये तरुणीची हत्या करण्यात आली त्या कारमधून मिळालेला चाकू हा ब्रँडेड कंपनीचा होता. तो एखाद्या सेटपैकी एक असल्याचे वाटत होते.

- पोलिस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेपूर्वी पती-पत्नी दोघे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणचे व्हिडीओ फुटेज पाहिल्यानंतर घटनेनंतर पीयूषने टी शर्ट बदलला असल्याचे स्पष्ट होते. त्याने टी शर्ट का बदलला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढे वाचा, ज्योतीच्या वडिलांनी व्यक्त केला होता संशय