आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैराना अहवाल: हिंदूंचे स्थलांतर झाल्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडून मान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - श्यामली जिल्ह्यातील कैरानातून २५० हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अहवालात मान्य केले आहे. यासोबत पलायनावर भाजप खासदार हुकूमसिंह यांच्या सुरुवातीच्या दाव्यालाही योग्य ठरवले आहे. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर बुधवारी कैरानाच्या अहवालाचा एक भाग प्रसिद्ध करण्यात आला. यासोबत आयोगाने यूपी सरकारकडून प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे.

प्रसार माध्यमाच्या वृत्तानुसार, आयोगाने आपल्या अहवालात जवळपास २५० हिंदू कुटुंबांनी परिसरातील बहुसंख्य समुदायाला भिऊन स्थलांतर केले होते. आयोगाने पथकाच्या शिफारशी मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना पाठवून आठ आठवड्यांत कारवाई अहवाल (एटीआर) देण्यास सांगितले आहे. कैरानामध्ये हिंदू कुटुंबातील महिलांवर मुस्लिम तरुण अभद्र भाषेत टिप्पणी करत होते,असे जवळपास २४ साक्षीदारांनी मान्य केले. यामुळे हिंदू महिला कमी प्रमाणात घराबाहेर पडतात. असे असले तरी महिला याची तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. मानवी हक्क आयोगाचे उपसंचालक जेमिनीकुमार म्हणाले, चौकशी वेळी आमच्या पथकाने कैराना, मुजफ्फरनगर आणि पानिपतच्या अनेक भागांचा दौरा केला. भाजप खासदार हुकूमसिंह यांच्या सचिवांकडून स्थलांतर केलेल्या ३४६ कुटुंबांची यादीही घेतली होती. काही पीडितांशी फोनवर चर्चा झाली.

टोळीची भीती
पथकाने त्या भागातील मुकीम काला टोळीच्या दहशतीलाही दुजोरा दिला आहे. अहवालात म्हटले की, टोळीचा म्होरक्या कालाने पाच वर्षांत कमीत कमी ४७ दरोडे, खून, चोरी आणि खंडणीसारखे गुन्हे केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...