आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगलांना लुटून करायचे Gangrape, 2 वर्षांत 45 मुलींवर अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपींचा म्होरक्या. - Divya Marathi
पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपींचा म्होरक्या.
इंदूर - पिकनिक स्पॉटवर येणाऱ्या प्रेमी युगुलांना टार्गेट करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी आधी जोडप्यांना लुटायची त्यानंतर मुलींबरोबर गँगरेप केला जायचा. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या या टोळीच्या म्होरक्याने 2 वर्षांत 45 मुलींवर गँगरेप केल्याची कबुली दिली आहे. काही मुलींचे व्हिडिओ तयार केल्याचेही त्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूरपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या कजलीगड पिकनिक स्पॉट आहे. येथे अनेक प्रेमी युगूलही येत असतात. काही दिवसांपूर्वी येथे सहा विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकार घडला होता. त्याच्या तपासादरम्यान एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी पाच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, तर मंगळवारी टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला.

आरोपींनी चौकशीत धक्कादायक खुलासे केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी एकांतात बसलल्या दाम्पत्यांना हेरायची आणि त्यांना लुटायचे. त्यानंतर मुलाला बांधून मुलीबरोबर गँगरेप करायचे तसेच त्याचा व्हिडिओदेखिल तयार करायचे. तसेच लगेच पोलिसांना याबाबत कळवता येऊ नये म्हणून त्यांच्या मोबाईलचे सिमकार्डही काढून फेकायचे. बदनामीच्या भीतीने मुले मुली पोलिसांत तक्रार करत नव्हते. त्यामुळेच या टोळीला बल मिळत गेले.

ब्लॅकमेलही केले
टोळीच्या म्होरक्याचे नाव श्रीराम कालूसिंह आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी व्हिडिओ सार्वजनिक कर्याची धमकी देऊन त्यांनी नंतरही काहीवेळा लोकांकडून पैसे उकळले आहेत. या टोळीकडून काही शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिस आता आरोपींकडून बलात्काराचे व्हिडिओ मिळवत आहे. पोलिसांनी या टोळीने अत्याचार केलेल्या काही लोकांशी संपर्कही केला, पण त्यांनी तक्रार करण्यास नकार दिला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...