आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी तडाख्यात बिहारमध्ये ६५ ठार, ७ जिल्ह्यांत ‘कालबैसाखी’चे तांडव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारच्या ईशान्येकडे सात जिल्ह्यांना मंगळवारी रात्री नेपाळहून आलेल्या ‘कालबैसाखी’ नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात ६५ जणांचा मृत्यू, तर अडीच हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. चक्रीवादळासोबत गारपीटही झाल्याने या सात जिल्ह्यांत वीजपुरवठा ठप्प झाला. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अस्ताव्यस्त झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. तेथे ४० जणांचा मृत्यू झाला. पाचशेपेक्षा जास्त पाळीव जनावरेही मृत्युमुखी पडली. मधुबनी जिल्ह्याच्या नैऋत्य भागात मोठे नुकसान झाले. तीनशेपेक्षा जास्त घरे-झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

अब्जावधी रुपयांच्या पिकांचे नुकसान : सात जिल्ह्यांत मका,गहू, भुईमूग या पिकांव्यतिरिक्त आंबा, लिची आणि केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अब्जावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात अाला आहे.