आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशाकडे पाहतो तेव्हा कल्पनाशी बोलल्याचे जाणवते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - अखेर वडील आहे मी तिचा. मुलीची आठवण राहून राहून येतेच. ज्या मुलीवर जगाने अभिमान बाळगला तिच्याशी गच्चीवर बसून आकाशाकडे पाहत आजही ५ ते ३० मिनिटे संवाद साधतो. यातून ती माझ्यापासून खूप दूर गेली नाही याची जाणीव होते, अशी भावना भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर दिवंगत कल्पना चावलाचे वडील बनारसीदास चावला यांनी "फादर्स डे'निमित्ताने आठवणी जाग्या केल्या.

आम्ही दोघे जणू एकांतात बोलत आहोत. १३ वर्षांपासून हा संवाद सुरू आहे. शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मुलीशी बोलतच राहीन. अनेकदा डोळे भरून येतात. प्रेमळ मुलीची आठवण तर येणारच.

राहून राहून आठवण येते
कल्पनाची राहून राहून आठवण येते. "फादर्स डे' दिवस तर कटतो, पण सायंकाळी गच्चीवर जातो. खुर्ची टाकून बसल्यावर मुलीची आठवण येते. कारण या दिवशी ती बहुतांश वेळ माझ्यासोबत घालवत होती. आमच्याकडे भेटवस्तू देण्याची प्रथा नव्हती आणि नाही. त्यामुळे आम्ही गप्पा मारण्यावर भर देत असू. कधी करिअरच्या, तर कधी जीवनातील विषय असायचे.

हट्ट करून विमानात बसली होती !
कल्पनाचे वडील म्हणाले, ती लहान होती तेव्हा अंगणातून विमाने उडताना पाहत असे. तिने विमानात बसण्यासाठी हट्ट धरला तेव्हा तिला सायकलवर बसवून करनालच्या धावपट्टीवर नेले आणि कल्पनाची इच्छा पूर्ण केली. कल्पना चावलाचा १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया अंतराळ यान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. करनाल नव्हे तर आज जगभरातील लोक तिची आठवण काढतात.

अखेरच्या क्षणीही खिशात वडिलांचा फोटो
सन २००३ मध्ये नासाचे यान जाणार होते तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांनी कल्पना चावलाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अमेरिकेने परवानगी दिली. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर काही कारणास्तव उड्डाण ३६ तास उशिरा झाले. रस्त्यात १२ तासांच्या विश्रांतीमुळे आणखी उशीर झाला. कुटुंबात ९ सदस्य होते. नासाने भेटण्यासाठी केवळ ४५ मिनिटे दिली होती. मात्र,भेट होऊ शकली नाही. तोपर्यंत यान अंतराळाच्या दिशेने झेपावले होते. चार दिवसांनंतर नासाने कल्पनाशी व्हीसीद्वारे संवाद घडवून आणला. आई-वडिलांसाठी एक विमान पाठवू शकत नाही का? असे रागात तिला म्हणाले. यावर कल्पनाने खिशातून आई-वडिलाचे छायाचित्र काढले आणि म्हणाली, ‘पप्पा, तुम्ही कायम माझ्याजवळ आहात.’
बातम्या आणखी आहेत...