आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात दोन एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 31 ठार, 250 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद/भोपाळ - मध्य प्रदेशच्या हारदामध्ये काल (मंगळवार) रात्री दोन एक्स्प्रेस गाड्यांचा भीषण अपघात झाला. इटारसी-मुंबई रेल्वे मार्गावर हारदा-खिरकियादरम्यान काली माचक नदीवरील पुलाखालील भराव वाहून गेल्याने मुंबई-वाराणसी कामायनी एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरून घसरले. तसेच याच मार्गावर जनता एक्स्प्रेसचेही पाच डबे रूळावरून खाली उतरले आहेत. दोन्ही एक्स्प्रेसचे डबे नदीत कोसळल्याने अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आतापर्यंत 31 प्रवाशांचा मृत्यु झाला असून 250 जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जनता एक्सप्रेसमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना विजेचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इटारसीहून मदत पथक असणारी रेल्वे घटनास्थळी पोहोचली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांचा संपर्क तुटल्याने घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. अपघातग्रस्त डब्यांमध्ये 300 पेक्षा अधिक प्रवासी असण्याची शक्यता आहे. अनेक प्रवासी पाण्यात वाहून गेल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
कामायनी एक्सप्रेसचा अपघात रात्री 11.10 च्या सुमारास झाला. त्याबाबत रात्री 12.30 वाजता इटारसी स्थानकाला माहिती मिळाली. रेल्वे भिरंगी स्थानकाहून निघाली होती. 11.25 वाजता ती येथे पोहोचणार होती. रेल्वे इंजिनाने काली माचक नदी पार केली तेवढ्यात अचानक एक झटका लागून रेल्वे थांबली. रेल्वेत असलेल्या जळगावच्या एका प्रवाशाने सांगतिले की, ते इंजिनच्या मागे असलेल्या जनरल बोगीमध्ये होते. इंजिन नदीच्या पुढे गेले होते. त्यांची बोगीही पुढे होती. पण एस-4 च्या मागे असलेले डबे नदीत होते. नदीला पूर आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणे गोंधळ पसरलेला आहे. यामार्गावरून मुंबई आणि इटारसीकडे येणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वेचे काही डबे पाण्यात आहेत. दूसऱ्या ट्रॅकवर खंडवा येथून जाणारी चंदीगड-यशवंतपूर रेल्वेही थांबली आहे. रात्री 1 वाजता कलेक्टर रजनीश श्रीवास्तव आणि एसपी प्रेमबाबू शर्मा रेल्वे स्थानकावर पोहोचले.

इटारसी-भुसावळ ट्रॅकवर खिरकियाच्या भिरंगी आणि मसनगाव दरम्यान 668/10 पुलावर ट्रॅकच्या खालची माती वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री 12 वाजता मेडिकल यान आणि रात्री 12.30 वाजता ब्रेक डाउन रवाना झाले.

इटारसी स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार मुबंईहून येणारी कामायनी एक्सप्रेस 11071 चे 3 आणि इटारसीहून मुंबईला जाणारी 13201 जनता एक्सप्रेसचे दोन डबे रेल्वेपासून दूर गेल्याचे आणि लटकले आहेत. इटारसी स्टेशनवर होशंगाबाद एसपी एपी सिंह यांनी आरपीएफ जवान दीवान यांच्याशी चर्चा केली. कामायनी एक्सप्रेसचे दोन डबे पाण्यात पूर्णपणे बुडाले असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते घटनास्थळी पाण्याचे प्रमाण एवढे जास्त आहे की, त्याठिकाणी लगेचच पोहोचणे शक्य नाही. मुंबईहून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत.

मदत रवाना झाल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी रात्री 1.45 वाजता ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. हरद्याजवळ झालेल्या अपघातात मध्यप्रदेश सरकारची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी ट्विट केले. रात्री उशीरा आरपीएफ आणि जीएम, डीआरएम व मेडिकल स्टाफसह मदतीसाठी रेल्वे घटनास्थळी पोहोचल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.

होशंगाबाद रुग्णालयात अलर्ट
अपघाताची माहिती मिळताच होशंगाबाद येथील रुग्णालय प्रशासनाला अलर्ट करण्यात आले आहे. कलेक्टर संकेत भोंडवे यांनी सांगितले की, इटारसी रेल्वे प्रशासनारकडून काही प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांना अलर्ट पाठवण्यात आला आहे.

LIVE UPDATES
> रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 31
> मृतांमध्ये 11 महिला, 11 पुरूष आणि सहा मुलांचा समावेश
> किरकोळ जखमींवर दुर्घटनास्थळावर उपचार
> बचावकार्य पूर्ण झाल्याची रेल्वे मंत्रालयाकडून माहिती
> लोकमान्य तिळक टर्मिनस (एलटीटी) स्टेशनवर दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी इमर्जन्सी कंट्रोल रुमची स्थापना
> राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून अपघातातील मृतांना श्रद्धांजली
> काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून अपघातातील मृतांना श्रद्धांजली
> रेल्वे मंत्रालयाकडून मदत जाहीर
*मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत
*गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत
*किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत
- बचावकार्य जवळपास पूर्ण, मात्र, कुणी अजून अडकलंय का याचा शोध सुरु
- अनिल सक्सेना, रेल्वे पीआरओ
- मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी आल्याने दुर्घटना- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
- वैद्यकीय पथक अपघातस्थळी दाखल, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु- रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश
- रेल्वे अपघातातील मृतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
> हादरा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदतीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
> रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी केली आहे. दिग्विजय यांनी 'टि्वटर'वर लिहिले आहे की, ''हे काय होता आहे, मिस्टर प्रभु. दिवंगत रेल्वेमंत्री लाल बहादुर शास्त्री यांनी एका अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
> इटारसीमध्ये प्रवाशांसाठी फर्स्ट एडची व्यवस्था. कामायानी एक्स्प्रेस रवाना, जनता एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्याचे प्रयत्न सुरु
> हादरा रेल्वे अपघात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.> 4 रेल्वे गाड्या रद्द, 22 गाड्यांचे मार्ग बदलले.

या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले...
व्हाया भुसावळ-सुरत-बैरागड-निशातपुरा
12147 कोल्हापूर -हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस व्हाया भुसावळ-सुरत
11077 पुणे -जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस
12137 सीएसटी-फिरोझपूर पंजाब मेल
11015 एलटीटी - गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
11057 सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस व्हाया जळगाव, भोपाळ
12617 एर्नाकुलम - हजरत निझामुद्दी मंगला एक्स्प्रेस

व्हाया भुसावळ-नागपूर-इटारसी
12322 सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद
12141 एलटीटी- राजेंद्रनगर एक्स्प्रेस
11093 सीएसटी - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस

व्हाया इटारसी-नागपूर-भुसावळ
11078 जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस
12142 राजेंद्रनगर -एलटीटी एक्स्प्रेस

व्हाया भोपाळ, नादियाड, भुसावळ
12597 गोरखपूर-सीएसटी एक्स्प्रेस

व्हाया निशातपुरा-बैरागड-जळगाव
12716 अमृतसर-हजुर साहिब नांदेड एक्स्प्रेस

व्हाया निशातपुरा-बैरागड-वसई रोड
12780 हजरत निझामुद्दीन -वास्को एक्स्प्रेस

व्हाया भुसावळ -नागपूर-इटारसी
11015 एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
11057 सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस
12322 सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद

व्हाया इटारसी-नागपूर-भुसावळ
12321 हावडा -सीएसटी मेल व्हाया अलाहाबाद
हेल्पलाइन नंबर:
हरदा- 09752460088
वाराणसी- 05422504221, 9794845312
भोपाळ- 0755-4061609
इटारसी-07572241920
बीना-07580222052
मुंबई सीएसटी-022-22694040
मुंबई एलटीटी-022-25280005
ठाणे- 022-25334840
कल्याण- 0251-2311499

2005 मध्ये अशाच अपघातात गेले होते 100 प्राण
>23 मे 2015 : असामच्या कोकराझारमध्ये चंपावती नदीत सिफुंग पॅसेंजरच्या बोगी कोसळले, सुमारे 38 जखमी
>29 जून 2005 : सिकंदराबाद पॅसेंजरच्या अनेक बोगी आंध्र प्रदेशच्या नलगोंडा जिल्ह्यातील मूसी नदीत पडल्याने 100 जण ठार
>22 जून 2001 : मंगलोर-चेन्नई मेलच्या चार बोगी कडालुंडी नदीत पडल्याने 57 प्रवासी ठार
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO आणि सुरेश प्रभु यांचे ट्विट