आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामदुनी सामूहिक बलात्‍कार, हत्‍या प्रकरणात तिघांना फाशी, तिघांना जन्‍मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- कामदुनी सामूहिक बलात्‍कार आणि हत्या प्रकरणात स्‍थानिक न्‍यायालयाने शनिवारी सहा जणांना शिक्षा सुनावली आहे. यातील तिघांना फाशीची शिक्षा, अन्‍य तिघांना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. या निर्णयावर प्रतिक्रीया देताना मृतक विद्यार्थिनीचा भाऊ म्‍हणाला की, निर्णयानंतर आम्‍ही समाधानी आहोत. पण निर्दोष सुटलेलया दोन आरोपींविरोधात आम्‍ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.
यांना झाली फाशी
सहा गुन्‍हेगारांपैकी सैफुल अली, अंसार अली आणि अमीन अली यांना न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यांना झाली जन्‍मठेप इमानुल इस्लाम, अमीनुर इस्लाम आणि भोला नास्कर यांना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे.
काय आहे प्रकरण
कामदुनीमध्‍ये एका 21 वर्षाच्‍या महाविद्यालयीन युवतीवर जून, 2013 मध्‍ये सामूहिक बलात्‍कार झाला होता. बलात्‍कारानंतर युवतीची हत्‍या करण्‍यात आली होती. कोलकातापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती. या प्रकरणा न्‍यायालयाने आठ आरोपींपैकी दोघांची निर्दोष सुटका केली.