आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनामो पर्वतावर पोहोचली अंध मांडवी, १९,६०० फूट उंच चढणारी पहिली महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - सात वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मात्र, मांडवी गर्ग यांनी त्यांच्यातील उर्मी जाऊ दिली नाही. हिंमत सोडली नाही. धैर्य कायम ठेवले. बँक व्यवस्थापक बनल्या आणि आता नुकताच हिसारच्या या शूर मुलीने लाहौल स्पिती येथील कनामो पर्वत सर केला आहे.
तोशाल रोडवरील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये शाखा व्यवस्थापकपदी कार्यरत ३० वर्षीय मांडवी हिसारच्या अर्बन इस्टेटमध्ये वास्तव्यास आहेत. मांडवी ग्रॅज्युएशन करत असताना रेटनायटिस पिग्मेंटटोजा आजारामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. त्यानंतरही त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बँक व्यवस्थापक बनल्या आणि गिर्यारोहणातही एवढे मोठे यश प्राप्त केले.
जमशेदपूरच्या एका अॅडव्हेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून मांडवी यांनी गिर्यारोहणासाठी अर्ज केला होता. तिथे पहिली महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांनी जेव्हा मांडवी यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्यांनी गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या पथकात त्यांना सहभागी करून घेतले. कमी ऑक्सिजन आणि तीन डिग्री तापमानादरम्यान मांडवी यांनी १९ हजार ६०० फूट उंच पर्वत सर केला. या पर्वताचे चढण सरळ आहे, ही विशेष बाब आहे. त्यामुळे १३ व्यक्तींच्या या पथकातील पाच जण अर्ध्या रस्त्यातूनच मोहीम सोडून गेले. ही मोहीम पूर्ण करण्यास सात दिवस लागले. २४ ऑगस्ट रोजी मांडवी आणि पथकातील अन्य सदस्यांनी गिर्यारोहणास सुरुवात केली होती आणि ३० ऑगस्ट रोजी ते पायथ्याशी परतले.
तंत्रज्ञानाला बनवले शस्त्र
रेटनायटिस पिग्मेंटटोजाच्या प्रथम टप्प्यात जस-जशी मांडवी यांचे डोळे दृष्टीहीन होत होते, तस-तशी त्यांना त्यांच्या शिक्षणाची चिंता वाटू लागली. यामुळेच त्यांनी गुगलवर आपल्या समस्येवर मार्ग शोधला. गुगलवर त्यांना स्क्रीन रीडिंग करू शकणाऱ्या एका सॉफ्टवेअरची माहिती मिळाली. त्यानंतर मांडवी यांनी दिल्लीला जाऊन तीन महिन्यांपर्यंत सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण घेतले आणि आज त्या केवळ संगणकच नव्हे, तर सेलफोनचाही वापर करतात. अँड्रॉइड फोनमध्येही टॉक बॅक ऑप्शन सुरू करून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्युटरवर आपले अकाउंटही अपडेट ठेवतात. टॉक बॅकही फोनच्या स्क्रीन रीडिंगचे काम करतो.