आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्‍हैयाला दाखवले काळे झेंडे, झाली हाणामारी, म्‍हणाला - मी घाबरणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - येथील श्रीकृष्‍ण मेमोरियल हॉलमध्‍ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्‍यक्ष कन्हैया कुमार भाषणासाठी व्‍यासपीठावर येताच काहींनी त्‍याला काळे झेंडे दाखवले. परिणामी, वाद निर्माण होऊन कन्‍हैयाचे समर्थक आणि विरोधकांमध्‍ये हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्‍ही गटांच्‍या काही जणांना ताब्‍यात घेतले. दरम्‍यान, कन्हैया म्‍हणाला, 'मुला तुम्‍ही दगडं मारा किंवा जोडे. मी घाबरणार नाही.
नेमके काय झाले...
> पाटण्‍याच्‍या श्री कृष्ण मेमोरियल हॉलमध्‍ये कन्हैयाचे व्‍याख्‍यान होते.
> कन्हैया मंचावर येताच काहींनी त्‍याला काळे झेंडे दाखवले.
> त्‍यामुळे कन्‍हैयाचे समर्थक भडकले.
> दरम्‍यान, विरोधक आणि समर्थकांमध्‍ये मारामारी झाली.
> एकच गोंधळ उडाला.
> कन्‍हैयाने मंचावरून लोकांना समजावण्‍याचा प्रयत्‍न केला.
> कन्हैया म्‍हणाला, आजघडीला देशभक्‍तीची व्‍याख्‍या बदलली आहे.
> 'पण, जी व्‍यक्‍ती कोटवधी लोकांच्‍या हक्‍काबाबत बोलते तीच व्‍यक्‍ती खरी देशभक्‍त आहे,' असे तो म्‍हणाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...