आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad Actress Rape Case, Union Railway Minister Sadanad Gauda

कन्नड अभिनेत्रीच्या तक्रारीवरून रेल्वेमंत्री गौडांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- एका कन्नड अभिनेत्रीच्या तक्रारीवरून रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांचे पुत्र कार्तिक गौडा यांच्यविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मी कार्तिकसोबत लग्न केले आहे. गौडा कुटुंबीयांनाही हे माहीत आहे, असे या अभिनेत्रीने गुरुवारी सांगितले.

बुधवारी अभिनेत्रीने कार्तिकविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दिली होती. गुरुवारी तिने माध्यमांसमोर आपली आपबीती सांगितली. दरम्यान, रेल्वेमंत्री गौडा यांनी आपल्या मुलाला फसवले जात असल्याचे सांगत कायदा आपले काम करेल, असे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे कोडागू जिल्ह्यातील कौशलनगरमध्ये बुधवारीच कार्तिक यांचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा झाला आहे.

कार्तिककडून गर्भवती
एका मित्रामार्फत आमची भेट झाली. तुझ्याशी लग्न करायचे आहे असे कार्तिकने मला सांगितले. त्याला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. मात्र, आमचे लग्न झालेळ नसल्याने मी नकार दिला. नंतर त्याने मंगळुरूतील घरी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले. आता मी त्याच्या बाळाची आई होणार आहे.