आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannada Actress Claims To Be Wife Of Sadananda Gowda\'s Son Karthik.

गौडांच्या मुलावर रेपचा आरोप करणारी अभिनेत्री म्हणाली, \'मी त्याच्या मुलाची आई बनणार\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिकवर बलात्काराचा आरोप करणारी कन्नड अभिनेत्री मैत्रेयीने, ती कार्तिकच्या बाळाची आई बनणार असल्याचा दावा केला आहे. मैत्रेयीचे म्हणणे आहे, की तिचे कार्तिकसोबत लग्न झाले आहे. मैत्रेयीने कार्तिकसोबतच्या तिच्या संबंधाची कहानी स्वतः कथन केली आहे. या प्रकरणी पोलिस कार्तिकची चौकशी करणार आहेत.
मैत्रेयीने पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ती काँग्रेस विचारांना मानणारी असल्याचे मान्य केले आहे. ती म्हणाली, 'माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी जुने नाते आहे. मी देखील दोन-तीन वर्षांपू्र्वी काँग्रेसची सदस्य झाले होते. मात्र, माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे मी पक्षात अधिक काम करु शकले नाही.' पत्रकारांनी जेव्हा मैत्रेयीला विचारले तुमच्या लग्नाच्या वेळी कोणकोण उपस्थित होते, त्यावर ती म्हणाली फक्त कार्तिकच्या कारचा चालक तिथे हजर होता.

पुढील स्लाइडमध्ये, कार्तिकसोबत अभिनेत्री मैत्रेयी