चेन्नई- 'हाय प्रोफाइल
सुनंदा पुष्कर मर्डर केस'वर आधारित सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. कन्नड आणि तमिळ चित्रपट दिग्दर्शक एमआर रमेश हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. परंतु, सिनेमाचे कथानक काय असेल, याची चिंता कॉंग्रेसला लागली आहे. सिनेमाचे कथानकाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न सुरु केले आहे.
रमेश यांच्या सिनेमाचे ‘गेम’ असे शिर्षक असेल. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि पत्नी सुनंदा यांच्या नातेसंबंधावर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
कॉंग्रेस प्रवक्ता खुशबू यांची 'स्टोरी'वर नजर
'गेम' हा सिनेमाचे काम सुरु असून सिनेमाचे कथानक काय असेल? हे माहीत करून घेण्याची जबाबदारी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता खुशबू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खुशबू यांनी दिग्दर्शक रमेश यांना थेट संपर्क न करता सिनेमाचे प्रचारप्रमुख मोहनम रवी यांना दोन वेळा फोन करून सिनेमाच्या कथानकाविषयी माहिती मागितली आहे.
काय म्हणतात दिग्दर्शक
सिनेमाचे दिग्दर्शक रमेश यांच्या मते, ‘खुशबू यांनी थेट मला फोन केला नाही. सिनेमाचे प्रचार प्रमुख रवी यांना दोनदा फोन करून कथानकाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी कोणाला कुठलीही माहिती दिली जाणार नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे,
आपण रवी यांना फोन केला नसल्याचे प्रवक्ता खुशबू यांनी म्हटले आहे. सिनेमाचा मोफत प्रचार करण्यासाठी रमेश अशाप्रकारच्या अफवा पसरवत असल्याची टीका खुशबू यांनी केली आहे.
मनीषा कोईराला दिसेल प्रमुख भूमिकेत...
‘ईलू-ईलू’ गर्ल या नावाने सर्वश्रृत असलेली बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला 'गेम'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल. सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यात सुरु झाले. परंतु, मनीषा कोईरालाने मागील आठवड्यातच शूटिंग ज्वाइन केले. मनीषा सध्या नेपाळमधील भूकंपग्रस्ताच्या मदतकार्यात व्यस्त आहे. सिनेमात अर्जुन सारजा आणि श्यामही दिसणार आहे.
राजीव गांधी आणि वीरप्पनवरही सिनेमा
दिग्दर्शक रमेश यांनी देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर 'सायनाइड' आणि चंदन तस्कर वीरप्पनवर 'अट्टहास' असे दोन सिनेमे बनवले होते. दोन्ही सिनेमे साउथमध्ये यशस्वी ठरले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पहिल्या भेटीतच सुनंदा यांच्यावर जडले होते शशी थरूरांचे प्रेम!