आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannauj » BJP Mp Sakshi Maharaj Said Madarsa Terrorism Education

\'मदरशात देतात दहशतवादाचे शिक्षण, मुलींना फसविण्यासाठी अरब राष्ट्रातून फंडींग\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नौज - उत्तर प्रदेशात पोटनिवडणुका झाल्यानंतरही वादग्रस्त वक्तव्याची श्रृंखला थांबलेली नाही. भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी आज (रविवार) येथे मुस्लिमांवर थेट हल्ला केला आहे. ते म्हणाले, 'सध्या जे मदरसे सुरू आहेत तिथे दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते.' लव्ह जिहादवर ते म्हणाले, 'हे मुस्लिमांनी जाणून-बुजून रचलेले षड्यंत्र आहे. त्यांच्या तरुणांना हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्यासाठी अरब देशातून फंडींग सुरु आहे.'
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी रविवारी कन्नौज येथील पत्रकार परिषदेत मुस्लिमांवर थेट निशाणा साधला. मदरशांवर सरकारचे नियंत्रण हवे, अशी मागणी त्यांनी केली. साक्षी महाराज यांच्याआधी उत्तर प्रदेश पोटनिवणुकीचे प्रचार प्रमुख खासदार योगी आदित्यनाथ यांनीही मुस्लिमांना लक्ष करणारे वक्तव्य केले होते.

पत्रकार परिषदेत साक्षी महाराज म्हणाले, 'मदरशे बंद केल पाहिजे. कारण तिथे राष्ट्रीयत्वाची शिकवण दिली जात नाही. एकाही मदरशात 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला तिरंगा ध्वज फडकत नाही? तिथे दहशतवादाची शिकवण दिली जाते त्यामुळे तिरंगा फडकेलच कसा? मरशांमध्ये फक्त कुराणच शिकविले जाते.'
'मुलींना फसविण्यासाठी त्यांच्या धर्मानुसार मिळतो पैसा'
साक्षी महाराज म्हणाले, 'त्या लोकांनी धर्माच्या हिशोबाने रेट फिक्स केले आहेत. सरदारची मुलगी असेल तर 11 लाख रुपये, हिंदू मुलीला फसविले तर 10 लाख रुपये आणि जैन असेल तर आठ लाख रुपये. सर्वांचेच रेट फिक्स आहेत. हा त्यांचा बिझनेस झाला आहे. या मुलींपासून झालेल्या मुलांना ते शिक्षण देत नाही तर, त्यांना दहशतवादी बनविण्याची शिकवण दिली जाते.'