आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanpur Biscuit Company Owner Daughter In Law Murder Latest News

ज्योती हत्याकांडाला वेगळे वळण; संशयाची सुई पती पीयुषच्या दिशेने, पोलिसांनी घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका नामवंत बिस्‍किट कंपनीच्या मालकाच्या सूनेच्या हत्याकांडप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या हायप्रोफाइल मर्डर केसची संशयाची सुई मृत ज्योतीचा पती पीयुषच्या दिशेने फ‍िरते आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयजी आशुतोष पांडेय यांनी सांगितले की, याप्रकरणात पीयूष हा प्राइम सस्‍पेक्‍ट आहे. पीयुष विरोधात पुरावे सापडले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिस सुत्रांनी सांगितले की, पीयुष पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नव्हता. अनेकदा त्याने जबाबही बदलवले होते. त्यामुळे ज्योती हत्याकांडात त्याचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत ज्योतीच्या शरीरावर चाकूने जवळपास दीड डझन वार करण्‍यात आले आहे. त्यामुळे या हत्याकांडात प्रोफेशनल किलर नसून नवख्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारणांवरून पीयुष संशयाच्या भोवर्‍यात...
>घटना घडल्यानंतर पीयुषने 100 नंबर डायल न करणे. तसेच घटनेनंतर तब्बल एक तासानंतर एफआयआर दाखल करणे.

>पीयुषचे कानपूरमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संबंधित महिलेचीही चौकशी केली आहे. पीयूषकडे दोन मोबाइल आहेत. हत्याकांडाआधी त्याने 27 जुलैला सायंकाळी सहा ते रात्री दोन वाजेच्या दरम्यान 150 मेसेज महिलेला पाठवले होते. पोलिसांनी दोन्ही मोबाइल जप्त केले आहेत.

- ज्या कारमध्ये ज्योती हत्या झाली त्या कारमध्ये सापडलेला चाकू ब्रांडेड आहे.

- हत्याकांडापूर्वी ज्योती आणि पीयुष एक हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. हॉटेलमधील व्हीडिओ फुटेजही मागवण्यात आले आहे. फुटेजमध्ये पीयुषने दोनदा टी शर्ट बदलल्याचे दिसत आहे. त्याने असे का केले असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

ज्योतीच्या वडीलांचाही पीयुषवरच संशय...
ज्‍योतिचे वडील शंकरलाल नागदेव यांच्या मते, पीयुष हा ज्योतीला दोन दोन तास बाथरुममध्ये बंद करून ठेवत होता. विशेष म्हणजे ज्योतीला आपल्या मोबाइललाही हात लावू देत नव्हता. ज्योतीने अनेकदा पीयुषच्या विचित्र वर्तवणुकीबाबत आपल्याकडे सांगितले होते. नागदेव यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

डिनर करून घरी येताना दोन बाइक स्वार गुंडांनी कार थांबवली. दोघांनी मला बेदम मारहाण केली. नंतर ज्योतीचे अपहरण केल्याचे पीयुषने पोलिसांना सांगितले होते. गुंडांनी त्याच्या हातावर लोखंडी रॉडने प्रहार केला होता. परंतु पीयूषच्या हाताला कुठलीही जखम नसल्याचे ज्योतीच्या वडीलांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो...
(फाइल फोटो: पीयूष आणि ज्योती)