आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanpur Jyoti Murder Case Piyush Get Work In Jail; Latest News In Marathi

ज्योती हत्याकांड: हनीमुनच्या रात्रीच आरोपी पीयूषचे उघडे पडले होते पितळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- हायप्रोफाइल ज्योती हत्याकांड प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. हनीमूनच्या रात्रीच या प्रकरणातील मास्टर मांइड आणि ज्योतीचा पती पीयूषचे पितळ उघडे पडले होते. मृत ज्योतीची डायरी सापडली असून त्यात तिने पती पीयूषच्या विवाहबाह्यसंबंधाबाबत उल्लेख केला आहे.
'हनीमूननंतरचे 12 दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होते. एअरपोर्टवरील लाऊन्जमध्ये पीयूषने मला सोडले होते. तो तब्बल दोन तास गायब होता. त्याचा फोनही सारखा व्यस्त येत होतो. तो कोणाशी तरी तासंतास बोलत असायचा. रात्री उशीरापर्यंत तासंसात बोलायचा. त्याचे कोणाशी तरी अफेयर सुरु असल्याचा मला संशय आहे', असे ज्योतीने आपल्या डायरीत नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कानपूर झोनचे आयजी आशुतोष पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, मृत ज्योतीला तिचा पती पीयूषच्या विवाहबाह्यसंबंधांची पूर्ण कल्पना होती. तरीदेखील ती आपल्या पतीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्यात ती अपयशी ठरली.
आरोपी पीयूषसह चार जणांची कानपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. स्वरूप नगर पो‍लिसांनी पाच आरोपींना पोलिस कोठडी मिळावी, यासाठी मागणी केली आहे. यावर आज (सोमवार) सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे, पोलिस ठाण्यात आरोपी पीयूषच्या कपाळाचे चूंबन घेतल्याप्रकरणी कानपूचे सीओ राकेश नायक यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, तुरुंगाबाहेर आल्यानंतर मनिषाला पीयूषशी विवाह करायचाय...
(फाइल फोटोः ज्योती हत्याकांडातील मुख्य आरोपी पीयूष)