आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 कोटी TAX भरणारा कपिल कधी राहात होता अशा सामान्य घरात, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिलच्या जुन्या घराचे इंटेरिअर. आता तो नव्या घरात गेल्याचे कळते. - Divya Marathi
कपिलच्या जुन्या घराचे इंटेरिअर. आता तो नव्या घरात गेल्याचे कळते.
मुंबई - कॉमेडियन कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींना, 'क्या यही है आपके अच्छे दिन' असा सवाल करुन राजकारण्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष्य आकर्षित केले. पहिल्या ट्विटमध्ये कपिलने, 'मी 15 कोटी रुपये टॅक्स भरत आहे. तरीही माझ्या ऑफिससाठी बीएमसीला 5 लाख रुपये लाच लागत आहे.' त्यानंतर कपिलने लगेच दुसरे ट्विट करुन मोदींना 2014 च्या निवडणूक प्रचारातील 'अच्छे दिन आनेवाले है' या घोषणेची आठवण करुन देत, 'क्या यही है आपके अच्छे दिन?' असा सवाल केला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून मुंबई महापालिका आणि शिवसेना सर्वच कामाला लागले. मात्र कपिल त्याचे प्रोडक्शन हाऊस K9 साठी नवीन ऑफिस तयार करत आहे की इतर कोणत्या ऑफिसचे त्याचे प्लॅनिंग आहे हे कळू शकलेले नाही.
मुंबईत घेतले नवे घर
काही दिवसांपूर्वीच कपिलने कथितरित्या मुंबईत नवे घर खरेदी केले आहे. जुलैमध्ये त्याने तिथे माता की चौकीचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो त्याच मित्र कॉमेडियन राजू श्रीवास्तवने शेअर केले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते,'माझा मित्र कपिल शर्माच्या घरी माता की चौकी आहे. नव्या घरासाठी शुभेच्छा.' फोटोमध्ये राजू, त्याची पत्नी शिखा, कपिल शर्मा आणि इतर मित्र दिसतात.
पू्र्वी साध्या घरात राहात होता कपिल
नवे घर खरेदी करण्यापूर्वी कपिल मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील आदर्शनगरमध्ये शांतीवन बिल्डिंगमध्ये राहात होता. 2010 मध्ये तो येथे राहायला आला होता. तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात नव्हता ना, त्याच्याकडे फार पैसा होता. कपिल शर्माच्या बिल्डिंग आणि प्रवेशद्वाराची छायाचित्रे बघितली असता, त्याचे घर किती साधे आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. नव्या घराचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, किती साध्या घरात राहात होता कपिल,
> पाहा जुन्या घराचे प्रवेशद्वार आणि बिल्डिंग....
बातम्या आणखी आहेत...