आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karala Richest Businessman Ravi Pillai Daughter Marriage

PHOTOS: केरळच्या श्रीमंत NRI ने पोरीच्या लग्नावर केली 55 कोटींची उधळण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम (केरळ)- या राज्यातील सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय उद्योगपती रवी पिल्लई यांची मुलगी डॉ. आरथीचे लग्न डॉ. आदित्य विष्णू यांच्यासोबत काल (गुरुवार) कोल्लम येथील असरामम मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य विवाहमंडपात झाले. या लग्नावर रवी यांनी तब्बल 55 कोटी रुपयांची उधळण केल्याने ते चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे रवी यांनी एकूण संपत्ती 2 अब्जांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
बाहुबली या गाजलेल्या सिनेमाचे आर्ट डायरेक्टर सावू सायरील यांनी या लग्नाचा सेट उभारला होता. त्यात राजस्थानच्या रॉयल पॅलेसची थीम ठेवण्यात आली होती. तब्बल 3 लाख 50 हजार चौरस फुट जागेवर लग्नाचा सेट उभा करण्यासाठी त्यांना 75 दिवस लागले. या लग्नासाठी तब्बल 30 हजार पाहुण्यांना बोलविण्यात आले होते. केवळ लग्नाच्या सेटसाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नासाठी 350 पेक्षा जास्त खासगी सुरक्षा रक्षक आणि मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.
यासंदर्भात सावू सायरील म्हणाले, की हा सेट उभा करण्यापूर्वी मुंबईतील एका फॅक्टरीत मातीपासून कलाकृती तयार करण्यात आल्या. त्यानंतर त्यावर प्लास्टर ऑफ पॅरीस चढविण्यात आले. या कलाकृती केरळला समुद्रमार्गे आणण्यात आल्या. त्यांची जोडणी करायला आम्हाला 40 दिवस लागले.
या महागड्या लग्नातील सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात गायथ्री यांनी मधूर भजनाने केली. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगणा मंजू वॉरिअर यांनी कुचिपुडी नृत्य सादर केले. त्याला स्टेफन डेवसी यांनी संगीतबद्ध केले होते.
पाहुण्यांसाठी चार्डट विमानांची सोय ठेवण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जपान कार्पोरेशनचे सीईओ, केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी, चित्रपट अभिनेते मोहनलाल आणि मामुथी तसेच बहरीन, सौदी अरेबिया, कुवैत, युएई येथील शाही कुटुंबातील सदस्य आदी या लग्नात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या शानदार लग्नाचे नेत्रदिपक फोटो....