आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karanataka Election, Political Party Gives Ticket To Relative

नात्यागोत्याच्या उमेदवारींचे पेव, कर्नाटक निवडणुकीत घराणेशाहीला ऊत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- 5 मे रोजी होणा-या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्याशी संबंधित सदस्यांना उमेदवारी दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने पुन्हा नात्यागोत्याच्या राजकारणाला चालना दिली जात आहे.

ज्येष्ठ कॉँग्रेस नेते आणि माजी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांचे जावई सईद यासीन रायचूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. कन्नड चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी पूजा गांधी यांनी बीएसआर काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना आव्हान दिलेले आहे. शरीफ यांनी आपला नातू अबुल रहमान शरीफ यांना हेब्बल मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. माजी मंत्री एच. एम. रेवन्ना त्यांच्याविरोधात लढत आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगारप्पा यांचे पुत्र मधू (जेडीएस) आणि कुमार (काँग्रेस) हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शिमोगा जिल्ह्यातील सोराब मतदारसंघातून पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे आहेत. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री एम. मल्लिकार्जुन खारगे यांनी पुत्र प्रियंकला चित्तपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे.

उमेदवारांच्या दर्शनासाठी रांगा
विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या आशेवर अनेक उमेदवार मंदिरासाठी रस्ते तयार करत आहेत. येथील गली अजेया मंदिर, नरसिंह मंदिरात उमेदवार व समर्थकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. दर्शन घेण्यापूर्वी उमेदवार आपल्या ज्योतिषाचा सल्ला घेत असून त्यानुसार ते विशिष्ट पूजा करत आहेत. आयुष्यात मंदिराकडे कधीही न फिरकणारे उमेदवार भक्तिभावाने दर्शन घेत असल्याचे दिसत आहेत.