आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Assembly Elections To Be Held On May 5

कर्नाटकमध्‍ये विधानसभा निवडणूक जाहीर, 5 मे रोजी मतदान; 8 ला मतमोजणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकामध्‍ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. राज्‍यात 5 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 8 मे रोजी होणार आहे. कर्नाटकमध्‍ये एकाच टप्‍प्‍यात मतदान होणार आहे. निवडणूकीची अधिसूचना 10 एप्रिलला काढण्‍यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्‍यासाठी 17 एप्रिलपर्यंत मुदत आहे. अर्ज मागे घेण्‍यासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत आहे. कर्नाटकमध्‍ये विधानसभेच्‍या 224 जागा आहेत. त्‍यापैकी 36 जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. तर 15 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. मतदानासाठी 50 हजार 446 मतदान केंद्र उभारण्‍यात येतील. सध्‍या कर्नाटकमध्‍ये 4.18 कोटी मतदारांची नोंद झाली आहे. सध्‍याच्‍या विधानसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे.