आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये व्होल्वो बसला लागलेल्या भीषण आगीत 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवेरी (कर्नाटक)- बंगळूर येथून मुंबईला जात असलेल्या व्होल्वो बसला हवेरी जिल्ह्यात भीषण आग लागल्याने 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आज (गुरुवार) पहाटे 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. बसमध्ये एकूण 52 प्रवासी होते.
रस्ता दुभाजकाला व्हॉल्वो बसची इंधन टाकी धडकल्याने बसला भीषण आग लागल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्येही आशाच प्रकारे व्होल्वो बसला आग लागली होती.
उत्तर कर्नाटकमधील हवेरीपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता दुभाजकावर आदळली. यात इंधन टाकीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बसने लगेच पेट घेतला. काही क्षणात बसला भीषण आग लागली. प्रवासी बसखाली उतरण्यापूर्वीच 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 6 गंभीर जखमी झाले.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील मेहबुबनगरमध्ये अशाच प्रकारे व्होल्वो बसला आग लागली होती. त्यात 45 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही बस बंगळूर येथून हैदराबादला जात होती.