आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka CM Siddaramaiah Has 70 Lakhs Rs Watch, 2 Lakhs Specks

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 70 लाखांचे घड्याळ, 2 लाखांचा चष्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक)- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. आता ते घडाळ्यावरुन चर्चेत आले आहेत. घड्याळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नव्हे तर चक्क 70 लाख रुपयांचे आहे. सिद्धरामय्या लाखोंच्या वस्तू वापरतात, मुलाच्या चित्रपटावर कोट्यवधी रुपये खर्च करतात असा आरोप धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमार स्वामी यांनी केला आहे.
सध्या कर्नाटकात पोटनिवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. एका प्रचार सभेत आरोपांच्या फैरी झाडताना कुमार स्वामी यांनी विचारले, की सिद्धरामय्या 70 लाख रुपयांचे घड्याळ वारतात. हे घड्याळ त्यांना कुणी दिले. त्यांच्याकडे एवढा पैसा कोठून आला. त्यांच्याकडे 2 लाख रुपये किमतीचा चष्माही आहे. त्यांनी मुलाच्या पहिल्या चित्रपटावर 70 कोटी रुपये खर्च केले.
सिद्धरामय्या यांच्या हातात असलेले हिरेजडीत 'हब्लोट' नावाचे घड्याळ कस्टम ड्युटी गृहित धरुन 70 लाख रुपये किमतीचे आहे. त्याची मुळ किंमत 68 लाख 56 हजार रुपये आहे.
या आरोपावर काय म्हणाले सिद्धरामैया.... साडीवरुनही आले होते चर्चेत... वाचा पुढील स्लाईडवर...