आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Election In Gulbarga & Vijapur Congress Marginally Win

कर्नाटक निकाल विश्लेषण : गुलबर्गा, विजापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील गुलबर्गा, विजापूर या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसने बाजी मारली आहे. यात दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. इंडीत कजपचे रवी पाटील, विजापूर शहरात बसवनगौडा पाटील, आळंदमध्ये जेडीएसचे सुभाष गुत्तेदार यांना पराभवाची चव चाखावी लागली.

केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियंक खरगे (चितापूर मतदार संघ) तर माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचे पुत्र डॉ. अजयसिंग (जेवरगी मतदार संघ), गुलबर्गा शहर दक्षिणमधून भाजपाचे अप्पू गौडा-पाटील हे विजयी झाले आहेत. प्रियंक खरगे व डॉ. अजयसिंग यांचा 2010 साली झालेल्या पोटनिवडणुकीत दोघांचा परावभ झाला होता हे विशेष आहे. इंडीत तीन टर्मनंतर रवी पाटील यांनी 2008 ला पराभव पत्करला. अवघ्या पाचशे मतांनी पडणूरचे यशवंत गौडा-पाटील यांचाही त्यावेळी पराभव झाला होता. भाजपाचे डॉ. बगली यांनी बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा यशवंत- गौडा पाटील व रवी पाटील यांच्यातच खरी लढत होती. अखेर यशवंत गौडा पाटील (58 हजार 562 मते मिळाली) यांनी बाजी मारली. रवी पाटील (25 हजार 260 मते मिळाली) त्यांचा सुमारे तेहतीस हजार 302 मतांनी पराभव झाला आहे.


गुलबर्गा : विजयी उमेदवार

काँग्रेस : कमरूल इस्लाम (गुलबर्गा उत्तर), जी. रामकृष्णा (गुलबर्गा ग्रामीण), डॉ. उमेशा जी. जाधव (चिंचोळी), प्रियंक खरगे (चितापूर), डॉ. अजयसिंग (जेवरगी), डॉ. शरणप्रकाश पाटील (सेडम), मलिकय्या गुत्तेदार (अफजलपूर).

भाजप : दत्तात्रय पाटील उर्फ अप्पू गौडा पाटील (गुलबर्गा दक्षिण)

कजप : बी. आर. पाटील (आळंद).

एकूण नऊ मतदार संघ

2013 : स्थिती-काँग्रेस (सात), भाजप (एक), कजप (एक)

2008 : स्थिती - काँग्रेस (तीन), भाजप (पाच), जेडीएस (एक)

विजापूर : विजयी उमेदवार

काँग्रेस : मकबूल बागवान (विजापूर शहर), सी. एस. नाडगौडा (मुद्देबिहाळ), एम. बी. पाटील (बबलेश्वर). शिवानंद पाटील (बसवनबागेवाडी), यशवंतरायगौडा -पाटील (इंडी), ए. एस. पाटील (देवरहिप्परगी), राजू आलगूर (नागठाण). भाजप : रमेश भुसनूर (सिंदगी).

2013 : स्थिती - काँग्रेस (सात), भाजप (एक)

2008 : स्थिती - भाजप (पाच), काँग्रेस (तीन)