आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karnataka Government Challenges Jayalalithaa Release

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जया यांच्या सुटकेला कर्नाटक सरकार आव्हान देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - तीन आठवड्यांच्या विचारमंथनानंतर कर्नाटक सरकारने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष सरकारी वकील बी.व्ही. आचार्य आणि राज्याचे वकील रविवर्मा कुमार आणि
कायदा विभागाच्या शिफारशीवर कर्नाटक मंत्रिमंडळाने सोमवारी शिक्कामोर्तब केले.
यानंतर कर्नाटकचे कायदामंत्री जयचंद्र म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला सर्वोच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आचार्य या प्रकरणात विशेष सरकारी वकील असतील. द्रमुक आणि काँग्रेसच्या तामिळनाडू शाखेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाने जयललिता आणि अन्य तीन जणांना बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारात दोषी ठरवले होते. त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ११ मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. सी.आर. कुमारस्वामी यांनी निकाल फिरवून जया यांच्यासह चार आरोपींना दोषमुक्त केले होते.