आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक सरकारला हवाय काश्मीरप्रमाणे स्वतंत्र झेंडा, जूनमध्येच नऊसदस्यीय समितीची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू/नवी दिल्ली- कर्नाटक सरकारने अापल्या राज्याचा स्वतंत्र झेंडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले अाहेत. हा झेंडा तयार करण्यासाठी व त्याबाबत कायदेशीर नियमांची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जूनमध्येच नऊसदस्यीय समिती तयार केली अाहे. मात्र या प्रकाराची अाता वाच्यता झाली.

कर्नाटकची विशेष अाेळख बनवण्यासाठी स्वतंत्र झेंड्याची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा अाहे. कन्नड व संस्कृती विभागाच्या सचिवांना त्याबाबतच्या समितीचे अध्यक्षपद देण्यात अाले अाहे. तर कानडी लेखक व पत्रकारांचाही समितीत समावेश अाहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘भारतात एक देश- एक झेंडा अशी व्यवस्था अाहे. प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंड्याची तरतूद नाही. मात्र राज्यांना असे करण्यापासून राेखण्याबाबतही घटनेत  तरतूद नाही.’ सद्यस्थितीत फक्त जम्मू- काश्मिर राज्याला स्वतंत्र ध्वज अाहे. या राज्यात कलम ३७० लागू असल्यामुळे त्यांना हा विशेष दर्जा प्राप्त अाहे.

राष्ट्रपती शासन लावा : शिवसेना
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘कर्नाटक सरकारचा हा निर्णय घटनाविराेधी व देशाच्या एकतेविराेधात अाहे. असा निर्णय घेणारे सरकार बरखास्तच करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी. यापूर्वी भाजपचे मुख्यमंत्री सदानंद गाैडा यांनीही अशा प्रकारचा प्रस्ताव फेटाळल्याचे हायकाेर्टात सांगितले हाेते.
बातम्या आणखी आहेत...