आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Minister For Social Welfare H. Anjaneya Told On Yoga

आळशी लोक योगसाधना करतात, मंत्र्याला उपरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री अंजानाह यांनी याेगसाधना हा आळशी लोकांचा उद्योग असल्याचे म्हटले आहे. ज्या लोकांकडे व्यायाम करायला फुरसत नाही तेच योगा करतात, अशी उपरती मंत्री महोदयांना झाली आहे.

सुखासीन कुटुंबातील लोकांना योगसाधना आवडते. अशा लोकांना चालणे व तत्सम व्यायाम आवडत नाहीत किंवा त्यासाठी वेळ नसतो तेच योगा करतात. जे लोक शेतात राबतात त्यांना योगाची काय गरज? असा प्रश्नही कर्नाटकच्या समाजकल्याण मंत्र्यांनी उपस्थित केला. राज्यातील काँग्रेस सरकार व देशातील इतर राज्य प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योगदिनी सहभागी होणार आहेत. तरीही मंत्र्यांना ही टिप्पणी करण्याचा मोह आवरता आला नाही.

दिले व्यायामाचे सल्ले, पंतप्रधानांनी देश चालवावा : जनतेने आपल्या मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करावे. धावणे, चालणे हे उत्तम व्यायाम प्रकार असून योगापेक्षा यावर अधिक भर देण्याचा सल्ला अंजानाह यांनी दिला आहे. पंतप्रधानांनीही योगापेक्षा देश चालवण्याकडे लक्ष द्यावे. तेच त्यांचे आद्यकर्तव्य आहे.

योग शिकवण्यासाठी योग तज्ज्ञ असताना पंतप्रधानांनी यात वेळ वाया घालवू नये, त्यांचा वेळ अमूल्य आहे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.