आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स सीडी प्रकरणामध्ये कानडी मंत्र्याचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू : सेक्स सीडी स्कँडलच्या कथित आरोपात अडकलेले कर्नाटकचे उत्पादन शुल्क मंत्री एच. वाय. मेती यांनी बुधवारी राजीनामा दिला. आपण कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, मात्र सिद्धरमैया सरकारची मानहानी टाळण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे मेती यांनी म्हटले आहे.
सेक्स सीडी स्कँडलचा वाद चिघळू लागल्यानंतर आणि विरोधकांनी मेतींना हटवण्याची मागणी लावून धरल्यानंतर मेतींनी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तो स्वीकारावा म्हणून मी राज्यपालांना शिफारस केली आहे, असे ट्विट सिद्धरमैया यांनी केले आहे. मेती हे मदत मागण्यासाठी आलेल्या एका महिलेशी अभद्र वर्तन करत असल्याच्या चित्रीकरणाची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते राजशेखर मुलाली यांनी केला होता. या सीडीप्रकरणी मेतींच्या काही समर्थकांनी आपल्याला धमक्या दिल्या, असा दावाही मुलाली यांनी केला होता.

मेती यांनी मात्र मुलालींना धमकावल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर येणारे वृत्त खोटे आहे. मी मुलाली यांना ओळखत नाही, मी त्यांना आज प्रथमच टीव्हीवर पाहिले आहे. माझ्या कुठल्याही समर्थकाने कोणालाही धमकी दिली नाही. ऑडिओ टेपमधील लोक जी भाषा बोलत आहेत ती उत्तर कर्नाटकमध्ये बोलली जात नाही. मी सध्या तरी पोलिसांत तक्रार करणार नाही. आधी त्यांना व्हिडिओ सादर करू द्या, आरोप सिद्ध करू द्या, त्यानंतरच मी पोलिसांत तक्रार करीन .
बातम्या आणखी आहेत...