आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निकाल- आतापर्यंत काय घडले आणि कोण काय म्हणाले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवत सात वर्षानंतर पुन्हा सत्ता मिळवली आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, 224 विधानसभेच्या जागांपैकी काँग्रेसने ११७ जागांवर आघाडी घेतली आहे. माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने 43 जागांवर, भाजपने 35 तर, बीएस. येडियुरप्पा यांच्या केजीपीने 10 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तर, इतर व अपक्ष 18 जागांवर आघाडीवर आहेत.

काँग्रेसने सात वर्षानंतर पुन्हा आपल्याकडे सत्ता खेचून आणली आहे. याबाबत काँग्रेसच्या नेतृत्त्वाने आनंद व्यक्त केला असून, दिल्लीसह बंगळुरात आनंदोत्सव सुरु झाला आहे.

- कर्नाटकमधील विजयाने आनंद, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नवनियुक्त आमदार ठरवतील- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा.

- कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा त्यांच्या विचारधारेचा पराभव आहे- पंतप्रधान मनमोहनसिंग.

- आम्ही कर्नाटक जनतेचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला बहुमतासह सत्ता दिली- सिद्धेरामय्या, काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार.

- हायकमांड जे काही सांगतील त्या निर्णयाचा आदर करु व स्वीकारु - काँग्रेस नेते व मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मल्लिकार्जुन खारगे.

- काँग्रेसने कर्नाटकात बहुमतासह विजय मिळवल्याने मी खूप आनंदात आहे - अर्थमंत्री पी. चिदंबरम.

- आम्ही विरोधी बाकावर बसणार असून, जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी लढत राहू- माजी पंतप्रधान व जनता दलाचे नेते एचडी. देवेगौडा.

- कर्नाटकमधील निकाल आम्हाला धक्कादायक वाटत नाहीत. मुख्तार अब्बास नक्वी, भाजपचे नेते व प्रवक्ते.

- काँग्रेसचा हा अपघाती विजय आहे. आमची मते विभागली गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला- रविशंकर प्रसाद, भाजपचे प्रवक्ते.

- आमच्या पराभावाला माध्यमे जबाबदार आहेत. माध्यमांनी आमच्या विरोधात मोहिम उघडल्याने आमचा पराभव झाला- माजी मुख्यमंत्री व जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी.

- माजी मुख्यमंत्री व केजीपी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बीएस. येडियुरप्पा यांनी शिकारीपुरा विधानसभा जागेतून 20 हजार मतांनी विजय मिळवला.

- महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार संभाजी पाटील ( दक्षिण बेळगावमधून) आणि अरविंद पाटील (खानापूर मतदारसंघातून) विजयी.

- काँग्रेस नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मल्लिकार्जन खारगे व सिद्धरामय्या आपापल्या मतदारसंघातून विजयी.

- भाजपचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव

- माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना भाजपने गमावले ही सर्वात मोठी चूक- भाजपमधील स्थानिक नेते लहेर सिंग.