आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Writer Held For Posting Rape Comment On Facebook

बलात्काराला चिथावणी; कन्नड लेखकावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - एका महिला कार्यकर्तीवर अत्याचारासाठी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप कन्नड साहित्यिक व्ही.आर. भट्ट यांच्यावर करण्यात आला आहे. कार्यकर्तीच्या तक्रारीवरून भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त आलोककुमार यांनी माहिती देताना सांगितले की, भारत विज्ञान समितीची सचिव असलेली महिला अंधश्रद्धेविरुद्ध जागृतीचे काम करते. याबाबत रविवारी त्यांनी फेसबुकवर विचार पोस्ट केले होते. भट्ट यांनी अवमानकारक पद्धतीने कॉमेंट टाकली होती. अशा कार्यकर्तीच्या झिंज्या पकडून चेहरा जाळून टाकला पाहिजे. तसेच बलात्काराची शिक्षा दिली पाहिजे, असे भट्ट यांनी म्हटले होते. भट्ट यांनी माफी मागितली असली तरी अत्याचाराची धमकी देणे गुन्हा असल्याचे कार्यकर्तीचे म्हणणे आहे.