बंगळुरू - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.
जयललिता यांना मंगळवारी कर्नाटक हायकोर्टाने जामीन नाकारला. विशेष न्यायालयाने २७ सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावल्यापासून त्या कैदेत आहेत. या प्रकरणी जामीन नाकारताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. व्ही. चंद्रशेखर यांनी जयललितांना विशेष कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासंबधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. जयांना ४ वर्षे कैद व १०० कोटी दंड कोर्टाने ठोठावला होता.