आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलायमसिंहाच्या सुनेचे पद्मावतीच्‍या वेशात घुमर नृत्य, करणी सेनेची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव बुधवारी पद््मावती चित्रपटावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. अपर्णांनी त्यांचा भाऊ अमन बिष्ट यांच्या साखरपुड्यात पद््मावतीच्या वेशात घुमरवर नाच केला होता. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी करणी सेनेने त्यांना राजपूत समाजात जन्म घेतला असल्याची आठवण  करून दिली. जनभावनांचा आदर करण्याचाही सल्ला दिला.

करणी सेनेचे लोकेंद्रसिंह कल्वी यांनी  म्हटले, राजपूत कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यांच्या सूनबाई अपर्णा यांनी राजपुतांच्या भावना लक्षात घ्याव्यात. 

राजस्थानी गाण्यावर नाचण्याची इतकी हौस असेल तर आम्ही त्यांना मूळ घुमर व इतर  राजस्थानी लोकगीते पाठवून देऊ असा सल्लाही दिला. या दरम्यान, काही लाेकांनी  अपर्णा यांना सोशल मीडियावरून धमक्याही    दिल्या आहेत. 

पद््मावती चित्रपटाची थ्रीडी प्रत सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली: पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या थ्रीडी प्रतीच्या प्रमाणपत्रासाठी सेन्सॉर बोर्डाला नव्याने अर्ज सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी  व निर्माता कंपनी व्हायकॉम १८ यांनी मंगळवारी बोर्डाकडे तिसऱ्यांदा अर्ज सादर केला. थ्रीडी ट्रेलरमध्ये मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. तथापि, आतापर्यंत चित्रपटाच्या २ डी व्हर्जनलाही सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळालेली नाही.
 
दीपिकासाठी बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या भाजप नेत्याचा राजीनामा
पद््मावती चित्रपटावरून दीपिका पदुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास १० कोटींची घोषणा करणारे भाजप नेता सूरज पाल अम्मू यांनी मुख्य माध्यम समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडलेला नाही. अम्मू म्हणाले, सकाळी स्वप्न पडले की, काही लोक शहीद होण्यासाठी परवानगी मागत होते. चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ९ डिसंेबर रोजी ते पंचकुला येथे मोर्चा काढणार आहेत. अम्मू यांनी वादग्रस्त विधान केल्यावरून पक्षाने नोटीस बजावली होती. मुख्यमंत्री खट्टर यांनी करणी सेनेची भेट टाळल्याने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला आहे.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...